राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री शासन निर्णय काढला आहे, ज्यात सग्यासोयऱ्यांना आरक्षणाचा मुद्दाही समाविष्ठ आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) लढ्याला मोठे यश मिळाले आहे. ह्या निर्णयानंतर वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते ज्यूस प्राशन करून जरांगेंनी उपोषण सोडले. तसेच सरकारने घेतलेल्या निर्णयांची जरांगे आणि शिंदे यांनी सर्वांना पुन्हा एकदा माहिती दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्या विजयी सभेनंतर ओबीसी (OBC) समाजाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद (Chhagan Bhujbal press conference) घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी अनेक महत्वाची विधाने केली आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे –
‘जात जन्माने येते, शपथपत्र देऊन नाही’
‘हा अध्यादेश नाहीतर फक्त मसुदा’
‘सगेसोयरे’ कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही’
‘मराठे 17 टक्के आरक्षणात येतील’
‘ओबीसींकडून लाखोंच्या संख्येने हरकती येणार’
‘मराठ्यांचा विजय झाला असं वाटत नाही’
‘मराठ्यांना फसवलं जातंय’
‘सरसकट गुन्हे मागे कशासाठी?’
‘पोलिसांना मारलं त्या गुन्ह्याचे काय?’
‘उद्या 5 वाजता माझ्या निवासस्थानी बैठक होणार’
(Maratha Reservation Manoj Jarange Patil Demands accepted Chhagan Bhujbal press conference)
हेही वाचा – पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकली! मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? वाचा मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे । Maratha Reservation
हेही वाचा – ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष