मराठा आरक्षण (Maratha Reservation) बाबत मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटलांनी ‘मराठा आरक्षणा’ची लढाई जिंकली आहे. सगेसोयरेंच्या आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे उपोषण मागे घेणार आहेत. दरम्यान सगेसोयरे बाबतचा अध्यादेश आजपासूनच लागू होणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. रात्री उशीरा सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय झाला. स्वतः जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मनोज जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे –
“मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत. सापडलेल्या नोंदींचं प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं. तसंच त्यांच्या परिवारांना ताबडतोब प्रमाणपत्र देण्यात यावेत, असा आपला लढा होता. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबतचा डाटा सरकार थोड्याच दिवसांत देणार आहेत.”
“ज्याची नोंद सापडली, त्याच्या सगासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्याकरता अध्यादेश पारित करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मूळ मागण्या पूर्ण झाल्या आहेत. या अध्यादेशावर राजपत्रक काढले आहे. यावर तीन तास चर्चा झाली. मुंबई हायकोर्टाच्या वरिष्ठ वकिलांनी शब्दान् शब्द वाचून खात्री केली आहे. त्यानंतरच बाहेर पडलो.”
”दोन वेगवेगळ्या बैठका होत्या. मंत्रिमहोदय आणि सचिवांची एक बैठक झाली आणि आमच्या वकिल बांधवाची वेगळी बैठक झाली. सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबतचा अध्यादेश घेतला आहे. लढाई आपली यासाठी होती. तिसरा मुद्दा आंतरवालीसह राज्यभर मराठा आंदोलकांवर लावलेले गुन्हे मागे घेण्याचे पत्रही गृहमंत्र्यांनी दिलं आहे.”
“मराठवाड्यात आणि इतर नोंदी कमी सापडल्या आहेत. त्यामुळे या नोंदी शोधण्याकरता शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, त्यांनी मुतदवाढ करण्याची मागणी मान्य केली असून याबाबत लेखी पत्र घेतले आहे. त्यानुसार, सर्व पत्र आणि शासननिर्णय घेतले आहेत. वंशावळ जोडण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन केली आहे. त्याचाही शासननिर्णय झाला आहे.” ( Maratha Reservation Fight Successful Manoj Jarange Patil Demands Accepted By Maharashtra Govt )
अधिक वाचा –
– ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष
– श्रेयस दर्डे, आदेश फलके, रुशील पटाडिया यांंच्या प्रकल्पांची राजस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड । Kamshet News
– दैनिक मावळ ‘संवाद’ : महापुरुषांचे जीवनपट खणखणीत आवाजात उलगडणाऱ्या शाहीर विनता जोशी यांच्यासोबत खास बातचीत । Vinata Joshi