पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा आणि एका आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा जास्त वसुली केलेल्या मावळातील प्राथमिक शेती संस्थांचा सत्कार वडगाव मावळ येथे शुक्रवारी (दि. 26) संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘मावळ तालुक्यातील संस्थांनी आतापर्यंत शेती कर्ज, पीक कर्ज इ. कर्जवाटप करुन संस्थेच्या सभासदांची गरज पूर्ण केली आणि सुयोग्य कर्ज पुरवठ्यातून उत्पादन वाढीचे ध्येय गाठले. थकबाकीचा अडथळा येऊ नये हे जाणून घेत शंभर टक्के परतफेड करीत संस्थांनी मोलाची कामगिरी केली आहे. मावळातील संस्थांमार्फत शेतकऱ्यांसाठी भात खरेदीसारखे नाविन्यपूर्ण विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुढील काळात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी या संस्था खऱ्या अर्थाने विकास केंद्र म्हणून काम करतील, अशी आशा आहे.’ असे आमदार सुनिल शेळके यांनी म्हटले.
ह्यावेळी आमदार सुनिल शेळके यांसह पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, सहकार महर्षी माऊली दाभाडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सहा. निबंधक सर्जेराव कांदळकर, माजी सभापती गणपतराव शेडगे, बाजार समिती सभापती संभाजी शिंदे, तसेच संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद आदी. मान्यवर उपस्थित होते. ( PDCC Bank Farmers Meeting At Vadgaon Maval In Presence of MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकली! मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? वाचा मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे । Maratha Reservation
– ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष
– ग्रुप ग्रामपंचायत वरसोली येथील ‘महिला अस्मिता भवन’चे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन । Maval News