प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) निमित्ताने पवन मावळ परिसरातील प्रत्येक गावातून क्रिकेट संघ घेत, ओल्ड इज गोल्ड क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शैलेश वहिले यांनी यापूर्वी पवन मावळ येथील भरपूर क्रिकेट स्पर्धेत नाव कमावले होते. तसेच त्यांनी लेदर क्रिकेट मध्ये मावळ तालुक्यातील अनेक गावातील खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून दिला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यासह त्यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय खेळाडू सोबत खेळण्याची संधी मिळाली. आईपीएल पुणे वारे वॉरियर्स संघासोबत त्यांना सराव करण्याची संधी भेटली. सिंगापूर मध्ये त्यांना साऊथ आफ्रिका (अ) संघासोबत खेळण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने पवन मावळ क्रिकेट स्पर्धेत बक्षीस समारंभात राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले आजवरच्या क्रिकेट कामगिरी बद्दल पवन मावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्ञानेश्वर ठाकर, हर्षल छाजेड, अमित कदम, नितीन कालेकर, शंकर कालेकर हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. ( Pawan Maval Cricket Ratna Award presented to national player Shailesh Vahile )
अधिक वाचा –
– ‘मराठ्यांचा विजय झाला असे वाटत नाही..कायद्याच्या कसोटीवर हा निर्णय टिकणार नाही..मराठ्यांना फसवलं जातंय..’- वाचा छगन भुजबळ काय बोलले? । Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal
– पाटलांनी आरक्षणाची लढाई जिंकली! मराठा समाजाच्या कोणकोणत्या मागण्या मान्य? वाचा मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे । Maratha Reservation
– ब्रेकिंग! मराठा बांधवांसाठी आरक्षणाची पहाट उगवली, मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मराठा समाजाकडून विजयाचा जल्लोष