तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे माजी नगरसेवक गोपाल दगडू परदेशी यांचे आज, रविवार (दि. 28) रोजी आकस्मिक निधन झाले. आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने परिसरात शोककळा पसरली असून एक उमदा व्यक्ती गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गोपाल परदेशी यांनी वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 10 वाजता राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघेल, असे कुटुंबीयांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ते माजी नगरसेवक होते. तसेच आवाज न्युजचे संपादक, दुर्गामाता मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी निभावल्या. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक असून तळेगाव दाभाडे येथील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. नेहमीच हसमुख स्वभाव असणार गोपाल परदेश सदैव समाजातील विविध उपक्रमात आवर्जून सहभागी होत. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. ( Talegaon Dabhade Nagar Parishad Former Nagarsevak Gopal Pardeshi Passed Away Due To Heart Attack )
अधिक वाचा –
– राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांना पवनमावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान
– वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार
– पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि घात झाला; पवना धरण जलाशयात बुडून 20 वर्षीय युवकाचा मृत्यू । Pavana Dam Maval