एक सांबर हरीण श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाले आहे, अशी माहिती किरण शिरसट यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे आणि सदस्य चंद्रकांत बोंबले यांना शनिवारी (दि. 27) दुपारच्या सुमारास दिली. तेव्हा वेळ न दवडता वनविभाग शिरोताचे वनरक्षक चव्हाण आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य चंद्रकांत बोंबले आणि जिगर सोलंकी नेसावे गावात पोहोचले आणि सांबराला रेस्कूय केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राथमिक पाहणी केली त्यात थोडी जखम दिसून आली. वनविभाग शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली जखमी सांबराला पुणे रेसकु सेंटर इथे पाठवण्यात आले. विशाल शिरसट, अनिल शिरसट, रामदास शिरसट, भरत शिरसट, दत्ता शिरसट, गुलाब शिरसट, सूरज शिरसट, सागर शिरसट या ग्रमास्थांनी यावेळी मोलाची मदत केली.
कोणताही वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळल्यास जवळपासच्या प्राणीमित्रांना किंवा वनविभागला संपर्क (1926) करावा असे आव्हान वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे 9822555004 आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी लोकांना केले आहे. ( Giving life to Sambhar deer Wildlife Vanyajiv Rakshak Sanstha and Forest Department Maval )
अधिक वाचा –
– मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!
– राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांना पवनमावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान
– वडगावमध्ये पीडीसीसी बँकेमार्फत शेतकरी मेळावा; आर्थिक वर्षात 90 टक्के पेक्षा अधिक वसुली केलेल्या शेती संस्थांचा सत्कार