मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि. 28) पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे पुणे – लोणावळा दरम्यान अनेक उपनगरीय गाड्या रद्द राहतील, अशी सुचना देण्यात आली आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल कृपया सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मेगा ब्लॉकमुळे रद्द होणाऱ्या गाड्या खालीलप्रमाणे –
- पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9.57 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 11.17 वाजता सुटणारी लोकल राहील
- पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी 3 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी 3.47 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी 4.25 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- शिवाजीनगर वरून लोणावळ्यासाठी सायंकाळी 5.20 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता सकाळी 10.05 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2.50 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- तळेगाव येथून पुण्यासाठी सायंकाळी 4.40 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- लोणावळ्याहून शिवाजीनगरकरीता सायंकाळी 5.30 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 6.08 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील
- लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 7 वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
( block on Pune Lonavala Railway Route 12 rounds of local Trains Cancelled )
अधिक वाचा –
– डिजेचा दणदणाट आणि गुलालाची उधळण! मराठा आरक्षण लढ्याला यश मिळताच लोणावळ्यात मराठा बांधवांकडून जल्लोष
– मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्यानंतर वडगाव मावळ शहरात सकल मराठा समाजाकडून जल्लोष!
– राष्ट्रीय खेळाडू शैलेश वहिले यांना पवनमावळ क्रिकेटरत्न पुरस्कार प्रदान