वडगाव येथील मावळ फेस्टिवल ग्रुपच्यावतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित मावळ फेस्टिवलचे उद्घाटन (शनिवारी, दि. 27) राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले. ‘कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मावळचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून आणि त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्याचा मावळ फेस्टिवलचा उपक्रम अभिनंदनीय आहे,’ असे गौरवोद्गार मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी काढले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मावळचे आमदार सुनिल शेळके हे होते. तर, देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, भाजपचे तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी उपसभापती गणेश ढोरे, भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष साहेबराव काशीद, अमोल बुचडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजपचे निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी नगराध्यक्ष मयुर ढोरे, मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, सुनील ढोरे, विलास काळोखे आदीजण यावेळी उपस्थित होते. ( Agriculture Minister Dhananjay Munde attended Maval Festival program in Vadgaon )
- मंत्री मुंडे व आमदार शेळके यांच्या हस्ते श्रीराम कला पथक (पवळेवाडी) यांना सांस्कृतिक पुरस्कार व एकवीरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती (कार्ला) यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बैलगाडा शर्यतीचा राजा-मावळ किंग ‘ओम्या’ याचा विशेष सत्कार करण्यात आला. ओम्याचे मालक रामनाथ वारिंगे यांनी पुरस्कार स्वीकारला. मावळ फेस्टिवलच्या डायलिसिस सेंटर या नियोजित प्रकल्पाची घोषणा यावेळी करण्यात आली. फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश जांभूळकर यांनी स्वागत केले. संस्थापक प्रवीण चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम प्रमुख विनायक भेगडे यांनी आभार मानले.
“वडगाव हे कला व क्रीडा संस्कृतीचे केंद्र आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सामावून घेण्याच्या मावळ फेस्टिवलच्या धोरण स्वागतार्ह आहे. मावळ फेस्टिवलच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी तालुक्यातील नागरिकांना मिळत आहे. तसेच मागील सोळा वर्षांपासून अखंडपणे सांस्कृतिक चळवळ पुढे चालवली जात आहे. त्यामुळे मावळची सांस्कृतिक नगरी अशी ओळख निर्माण होत आहे.” – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा ब्लॉक! ‘या’ 12 लोकल गाड्या रद्द, पाहा यादी । Block on Pune Lonavala Railway Route
– श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सांबर हरणाचा जीव वाचवण्यात प्राणीमित्रांना यश, मावळमधील नेसावे येथील घटना । Maval News
– दुःखद! तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गोपाल परदेशी यांचे आकस्मिक निधन, परिसरात शोककळा