राज्यसभेच्या 56 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 29 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 56 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 6 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 ला संपत आहे. 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
असा आहे निवडणूक कार्यक्रम –
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या या जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, या निवडणुकांसाठी 8 फेब्रुवारी रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. दि. 15 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून 16 फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होणार. दि. 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे. ( Rajya Sabha Elections 2024 Announced For 56 Seats 6 Seats In Maharashtra )
महाराष्ट्रातील हे खासदार होणार निवृत्त –
1. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार प्रकाश जावडेकर
2. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे
3. काँग्रेसचे खासदार कुमार केतकर
4. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई
5. भाजपचे खासदार श्री. व्ही. मुरलीधरन
6. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण
अधिक वाचा –
– बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श – शिक्षण आयुक्त सुरज मांढरे । Balbharati
– काले पवनानगर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश कालेकर यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024
– लेकाच्या लग्नात वरमाईची सोने आणि पैशाने भरलेली बॅग लंपास, सोमाटणे येथील घटना, अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल । Maval Crime News