मावळ तालुका नाभिक युवा संघटनेच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे येथील लायन्स क्लब हॉल येथे एकदिवसीय हेअर कट्स आणि केमिकल सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला तरूणाईचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. नवनाथ आतकर यांच्या मार्फत उपस्थितांना सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच उपस्थितांना विश्वकर्मा योजनेसाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांनीही या सेमिनारला उपस्थिती दाखवून सर्वांना मार्गदर्शन केले आणि उपक्रमाचे कौतूक केले. ओमकार शिंदे, सागर कदम, अनिरुद्ध चौधरी, राजू मोरे, सागर वारुळे, किसन आंबेकर, सागर खडके, योगेश ढमाले, मंगेश चातूर, बंटी निकम व रोहिदास आंबेकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. नाभिक समाजातील आणि विविध पक्ष, संघटनातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. ( enthusiastic response to One Day Hair Cuts and Chemical Seminar organized by Maval Taluka Nabhik Yuva Sangthana )
‘व्यवसाय प्रशिक्षण सेमिनार घेऊन समाजासाठी चांगला उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे. पारंपारिक कामात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे व्यवसायात संधी शोधणाऱ्या युवकांना याचा नक्कीच लाभ होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कौशल्य प्राप्त केल्यास यश नक्कीच मिळेल.’ – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– ‘रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– बालभारती हा जीवनातील पहिला हस्तस्पर्श – शिक्षण आयुक्त सुरज मांढरे । Balbharati
– काले पवनानगर ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी रमेश कालेकर यांची बिनविरोध निवड । Gram Panchayat Election 2024