गर्भधारणापूर्व माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ‘वात्सल्य’ या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जननक्षम माता (गर्भधारणेपूर्वीच्या), प्रसुतीपश्चात माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सुदृढ आरोग्यासाठी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. माता-भगिनींसाठी ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान, बालकांच्या आरोग्यासाठी जागरुक पालक-सुदृढ बालक तसेच पुरुषांच्या आरोग्यासाठी ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. ( Government of Maharashtra Vatsalya Yojana Information In Marathi )
या उपक्रमांना लोकसहभाग लाभल्याने हे उपक्रम यशस्वी ठरले आहेत. मेळघाट तसेच राज्यभरात दौरा करताना प्रा. डॉ. सावंत यांना गर्भधारणापूर्व मातांची समस्या लक्षात आल्यानंतर यासंदर्भात योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ‘वात्सल्य’ ही नवीन योजना राज्यभरात लागू करण्यात येत आहे. याविषयीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश, ‘हे’ खासदार होणार निवृत्त । Rajya Sabha Elections 2024
– ‘तळेगाव शहरात आपण नाट्यगृह आणणारच’, आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास । mla sunil shelke
– ‘रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प आपण सगळे मिळून साकार करुया’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे