मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर वाशी येथेच शनिवार (दि. 247 जानेवारी) रोजी राज्य सरकारने सुखद धक्का दिला. मराठा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य करत ‘सगेसोयरे’ यांना आरक्षण मिळवून देणारा अध्यादेश काढला. सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण राज्यभर मराठा समाजाकडून विजयाचा आनंदा साजरा करण्यात येत आहे. कार्ला येथे आंदोलन काळात 4 बांधवांनी बेमुदत आमरण उपोषण केले होते. त्यांचा मराठा बांधवांकडून सन्मान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नोव्हेंबरमध्ये अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषण सुरु केले होते. तेव्हा कार्ला (ता. मावळ) येथे भाऊसाहेब हुलावळे, कैलास पडवळ, संदिप तिकोणे, प्रकाश शिंदे यांनी आमरण उपोषण केले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने या आंदोलकांचा सन्मान करण्यात आला. ( Protesters who went on chain hunger strike for Maratha reservation were honored at Karla Maval )
कार्ला गावात मिरवणूकीने आरक्षण मागणी मान्यतेचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ह्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने कार्ला येथील सकल मराठा बंधू-भगिनी सहभागी झाले होते. कार्ला फाटा येथून सुरुवात झालेल्या या मिरवणूकीची सांगता हनुमान मंदिरासमोर झाली. येथे मिरवणुकीनंतर स्नेहभोजन पार पडले. तसेच वरील चारही आमरण उपोषणकर्ते आंदोलकांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
अधिक वाचा –
– मावळ तालुका नाभिक युवा संघटना आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार शेळकेंकडून उपक्रमाचे कौतूक
– मोठी बातमी! राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश, ‘हे’ खासदार होणार निवृत्त । Rajya Sabha Elections 2024
– ‘तळेगाव शहरात आपण नाट्यगृह आणणारच’, आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला विश्वास । mla sunil shelke