लोणावळा ते पुणे दरम्यान धावणाऱ्या लोकलचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्या (बुधवारी) उद्घाटन होणार आहे. लोणावळा रेल्वे स्थानक येथे दुपारी अडीच वाजता उद्घाटन होणार आहे. दानवे ऑनलाइन हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील ऑनलाइन उपस्थित असणार आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कोरोना साथ सुरु होण्यापूर्वी पुणे-लोणावळा दरम्यान लोकल गाड्यांचे संचालन व्यवस्थित सुरु होते. कोरोना साथीच्या कालावधीत रेल्वेची सेवाच बंद करण्यात आली. कोरोनानंतर आता देशात पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे सुरु झाल्या आहेत. कोरोना साथीच्या अगोदर पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत दोन लोकल गाड्या चालवल्या जात होत्या. त्या गाड्यांचे संचालन बंद होते .साडे दहा ते अडीच या वेळेत लोकल सेवा बंद होती. दुपारच्या वेळेत रेल्वे सुरू करण्याची मागणी खासदार बारणे यांनी संसदेत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सातत्याने केली होती. अखेरिस खासदार बारणे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. ( Raosaheb Danve will inaugurate afternoon local from Pune to Lonavala on Wednesday January 31 )
“लोणावळा ते पुणे दरम्यान लोकल उद्यापासून सुरू होणार आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांची मोठी सोय होणार आहे.” – खासदार श्रीरंग बारणे
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलनाची हाक! NCP Sharad Pawar Faction
– मावळ तालुका नाभिक युवा संघटना आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार शेळकेंकडून उपक्रमाचे कौतूक
– मोठी बातमी! राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर, महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश, ‘हे’ खासदार होणार निवृत्त । Rajya Sabha Elections 2024