ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ( Ashok Saraf Maharashtra Bhushan ) देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गेली 50 वर्षे मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महानायक अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात. उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना हसवले आणि प्रसंगी घडवले. तब्बल 250 मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे ते एकमेवाद्वितीय कलाकार आहेत. अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, आमच्या सारखे आम्हीच, आत्मविश्वास, नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जंमत या चित्रपटांमधील अशोक सराफ यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. करण अर्जुन, सिंघम यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील अशोक सराफ यांनी काम केले. ( Maharashtra Bhushan Award 2023 Announed To Veteran Marathi actor Ashok Saraf )
अशोक मामांचा सिनेप्रवास –
मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेलं. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या. त्यांची आजवरची लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे अशीही बनवा बनवी या सिनेमातली धनंजय मानेची भूमिका आहे. तसंच ‘पांडू हवालदार’ या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला. तसंच ‘राम राम गंगाराम’ या दोन चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. त्या दोन सिनेमांमधला अभिनयही लोकांच्या लक्षात आहे.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
अशोक सराफ यांनी… pic.twitter.com/u7F6KkDe8z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024
अधिक वाचा –
– गर्भधारणापूर्व माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘वात्सल्य’ योजना
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलनाची हाक! NCP Sharad Pawar Faction
– मावळ तालुका नाभिक युवा संघटना आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार शेळकेंकडून उपक्रमाचे कौतूक