मावळ तालुक्यातील कुसवली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांना दमदाटी करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामसेवक अतुल देवराम रावते यांनी याबाबत वडगाव मावळ पोलिसांत फिर्याद दिली आहे. तर, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ दशरथ भालेराव यांच्यावर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू, ह्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या मावळ तालुक्यातील ग्रामसेवकांनी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगाव मावळचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत सदस्य भालेराव यांनी कुसवली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन ग्रामसेवक रावते हे शासकीय मृत्यू नोंदणीचे काम करत असताना ‘तुम्ही माझे कोणतेच काम करत नाही. ग्रामपंचायतीची कामे मला विश्वासात न घेता करता व तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार करता. तुम्ही तुमच्या लोकांची कामे करता माझी कामे करत नाही’, असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमुद आहे. ( Gram sevak beaten In Kusavli Village Maval Taluka )
शासकीय कर्मचाऱ्याला काम करण्यापासून रोखून हाताने आणि खुर्ची फेकून मारहाण केल्याचेही नमुद आहे. त्यामुळे ग्रामसेवक यांच्या डाव्या कानाला दुखापत झाली आहे. या गंभीर प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अधिक वाचा –
– मराठा आरक्षणासाठी बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या ‘त्या’ 4 आंदोलकांचा कार्ला येथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार । Maratha Reservation
– गर्भधारणापूर्व माता आणि 2 वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारची ‘वात्सल्य’ योजना
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलनाची हाक! NCP Sharad Pawar Faction