मावळ तालुक्यात सध्या खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुकीची (Maval Taluka Cooperative Buying and Selling Union Election 2024) धामधूम सुरू आहे. संघाच्या 19 जागांसाठी तब्बल 94 उमेदवारी अर्ज आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. कुलकर्णी यांनी दिलीये. निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवारी (दि.30) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. बुधवारी (दि. 31) दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांची छाननी झाली. दिनांक 1 ते 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत आहे. तर, 16 फेब्रुवारी रोजी चिन्ह वाटप आणि 25 फेब्रुवारी रोजी मतदान व मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या 19 जागांसाठी दाखल झालेल्या 94 उमेदवारी अर्जांपैकी चार अर्ज छाननीत बाद झाले असून 90 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी दिली. 19 जागांसाठी प्राप्त झालेल्या तब्बल 94 अर्जांमध्ये सर्वपक्षीय इच्छुकांचा समावेश आहे. अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली, त्यात ‘अ’ वर्ग मतदार संघातील तीन व भटक्या जमाती, विमुक्त जाती मतदार संघातील एक अर्ज बाद झाला व 90 अर्ज वैध ठरले. ( Maval Taluka Sahakari Kharedi Vikri Sangh Nivadnuk 2024 Pune District )
मतदारसंघ निहाय जागा व वैध अर्ज पुढील प्रमाणे –
सर्वसाधारण ‘अ’ वर्ग प्रतिनिधी गट (लोणावळा, खडकाळा, वडगाव, टाकवे बुद्रूक, तळेगाव, साळुंब्रे, शिवणे, कोथुर्णे, आंबेगाव) अशा 9 गटांतील 9 जागांसाठी 23 अर्ज,
‘ब’ वर्ग (इतर सहकारी संस्था) – 2 जागांसाठी 11 अर्ज,
‘क’ वर्ग (वैयक्तिक सभासद) – 3 जागांसाठी 34 अर्ज,
महिला प्रतिनिधी – 2 जागांसाठी 8 अर्ज,
अनुसूचित जाती जमाती – 1 जागेसाठी 5 अर्ज,
इतर मागास प्रवर्ग – 1 जागेसाठी 9 अर्ज,
भटक्या विमुक्त जाती जमाती – 1 जागेसाठी 1 अर्ज.
छाननीअंती 90 अर्ज वैध ठरलेत. आता 15 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. दरम्यान भटक्या विमुक्त जागी एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्याठिकाणी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. ( Maval Taluka Cooperative Buying and Selling Union Election 2024 Pune District )
अधिक वाचा –
– ‘अहमदनगर वकील दांपत्य हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी’, वडगाव लीगल बार असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन । Ahmednagar Lawyer Couple Murder Case
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारी 2024 दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा तारखा । Pimpri Chinchwad RTO
– डॅशिंग आणि शिस्तप्रिय अधिकारी असा लौकिक असलेले पंकज देशमुख यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती! Pankaj Deshmukh