पुणे जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलिस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. आज (दि. 31) शासनाने अध्यादेश जारी करत या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले, त्यात गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे अतिरिकत् नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. चाळीसगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील. ( Pankaj Deshmukh Appointed as Pune Rural Superintendent of Police )
अमितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त –
अमितेश कुमार हे पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त झाले आहे. सप्टेंबर 2020 रोजी अमितेश कुमार यांची नागपूर पोलीस आयुक्त म्हणून निवड करण्यात आली होती. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त म्हणून आणि मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.
अधिक वाचा –
– गौरवास्पद! महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव, मावळ तालुक्यातील ‘या’ किल्ल्याचाही समावेश
– शाब्बास पैलवान..! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी मावळचा पैलवान वैष्णव आडकर याने पटकावले रौप्यपदक । Wrestler Vaishnav Adkar
– मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत युवक काँग्रेसचे वडगावमध्ये आंदोलन; शिक्षक भरती, तलाठी भरती, वीज प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदने