महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्कोच्या 2024-25 जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage List) यादीमध्ये नामांकनासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करतानाच या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 11 आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी पाठविण्यात आला आहे. ( Proposal To UNESCO For Nomination of 11 Forts In Maharashtra Including Lohgad Fort In Maval Pune )
‘नामांकनासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्रातील शिववारशांचा समावेश असून या किल्ल्यांना आता जागतिक ओळख मिळू शकणार आहे. युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, असा विश्वासही आहे.’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
… @UNESCO च्या २०२४-२५ च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांच्या नामांकनाचा प्रस्ताव केंद्र सरकारने पाठविला आहे, याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आनंद व्यक्त केला असून प्रधानमंत्री @narendramodi आणि केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे… pic.twitter.com/3Jq9uoH87v
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वासू हिरा काळाच्या पडद्याआड! आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन, सरपंच ते 4 वेळा आमदार, ‘अशी’ होती कारकीर्द । MLA Anil Babar Passed Away
– अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील ‘या’ भागात घडली घटना
– धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याची ग्रामसेवकाला मारहाण, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना । Gram Sevak Beaten Maval News