चेन्नई (तामिळनाडू) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मावळ तालुक्यातील शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पैलवान वैष्णव नारायण आडकर याने सलग दुसऱ्या वर्षी ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात 65 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. वैष्णव आडकरचे हे मागील पाच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील तिसरे रौप्यपदक आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ पुणे जिल्हा व तालुक्यात कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवली गावचा राष्ट्रीय पदक विजेता युवा मल्ल पै. वैष्णव नारायण आडकर याने चेन्नई, तामिळनाडू येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीकोरोमन कुस्ती प्रकारात 65 किलो वजनी गटात रुपेरी कामगिरी केली आहे. त्याने 65 किलो गटातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत अत्यंत अतितटीच्या लढतीत पंजाबच्या मल्लाकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगल्याने दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ( silver medal to wrestler baishnav adkar from maval pune at khelo india national wrestling competition )
- वैष्णव याची हि पाचवी राष्ट्रीय स्पर्धा होती. पाच राष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्यपदके पटकाविली आहे. गतवर्षी भोपाळ, मध्यप्रदेश येथे झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही 65 किलो वजनी गटात रौप्यपदक तर रांची, झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 63 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले होते. तर हरीद्वार व हारीयाणा येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर राष्ट्रीय व राज्य शालेय कुस्ती स्पर्धेतही रौप्यपदक पटकावले आहे.
वैष्णव हा मावळ तालुक्यातील शिवली गावातील राष्ट्रीय स्तरावर खेळलेला सहावा राष्ट्रीय कुस्तीगीर आहे. यामध्ये त्याचा भाऊ राष्ट्रीय कुस्तीगीर विपुल आडकरचाही समावेश आहे. वैष्णवचे वडील पै. नारायण आडकर व आजोबा स्वर्गीय दशरथ आडकर हे जिल्ह्यातील नामवंत कुस्तीगीर होते. वैष्णव हा वारजे, पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे व किशोर नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेत आहे.
वैष्णव याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे ऑलिंपिकवीर पै. मारुती आडकर, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सरचिटणीस पै. मारुती बहिरु आडकर, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय कुस्तीगीर पै. संभाजी राक्षे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. खंडू वाळूंज, सचिव पै. बंडू येवले, सहसचिव पै. पप्पू कालेकर, उपाध्यक्ष पै. सचिन घोटकुले, पै.मनोज येवले, पै. तानाजी कारके, राष्ट्रीय कुस्तीगीर पै.नागेश राक्षे यांच्यासह मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
अधिक वाचा –
– अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील ‘या’ भागात घडली घटना
– धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याची ग्रामसेवकाला मारहाण, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना । Gram Sevak Beaten Maval News
– ‘मामांना महाराष्ट्र भूषण’, मराठी सिनेरसिक आनंदी! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण जाहीर । Ashok Saraf Maharashtra Bhushan