“चांगली बुद्धिमत्ता असूनही तालुक्यात शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे लहान मुलांचे आणि युवा पिढीचे मोठे नुकसान होत आहे.”, असे मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी आपल्या भाषणात सांगितले. मंगळवारी (दि. 30) मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांना घेऊन मंगळवारी (ता. 30) वडगाव येथे युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, भारतीय युवक काँग्रेसचे सचिव महाराष्ट्र प्रभारी एहसान खान, प्रदेश सचिव चंद्रशेखर जाधव, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राजीव फळके, रोहिदास वाळूंज, विभाग अध्यक्ष विशाल वाळूंज, महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रतिमा हिरे उपस्थित होत्या. ( Youth Congress agitation in Vadgaon regarding various issues in Maval taluka )
“महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचे काम जोरदारपणे चालू आहे. पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातेच आहेत का? असा प्रश्व उपस्थित होतोय” असेही वाघोले पुढे म्हणाले. यावेळी तलाठी भरती प्रश्नाबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच तालुक्यात वेळोवेळी वीज नसल्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
विविष विषयांबद्दलची निवेदने संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. सदर मोर्चामध्ये युवक नेते अॅड. निखील कविश्वर, समन्वयक वासिम शेख, रईज शेख, प्रताप हुंडेकरी, स्वप्नील सावंत, निलेश बोडले, अजय चांदेकर यांच्यासह कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– धक्कादायक! ग्रामपंचायत सदस्याची ग्रामसेवकाला मारहाण, मावळ तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना । Gram Sevak Beaten Maval News
– ‘मामांना महाराष्ट्र भूषण’, मराठी सिनेरसिक आनंदी! ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण जाहीर । Ashok Saraf Maharashtra Bhushan
– मावळकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे-लोणावळा दरम्यान दुपारच्या लोकल ट्रेनचे रावसाहेब दानवेंच्या हस्ते होणार उद्घाटन । Pune Lonavala Local Train