भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा स्तरावरील प्रवासी कार्यकर्ता कार्यशाळा आज, बुधवार (दि. 31) तळेगाव दाभाडे येथे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांमध्ये राबविलेल्या विविध जनकल्याणकारी योजनांचा प्रचार प्रसार गावागावात शेवटच्या घटकापर्यंत माहिती व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रवासी कार्यकर्ता पुढील 10 दिवस प्रत्येक बूथ वर प्रवास करून जोमाने कार्य करणार आहे, असे यावेळी ठरवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बूथ स्तरावरील सर्व संघटनात्मक कार्य येणाऱ्या दहा दिवसात सर्व प्रवासी कार्यकर्त्यांनी पूर्ण करून मोदी साहेबांच्या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून बूथ वर भारतीय जनता पार्टीला 51 टक्के पेक्षा जास्त मतदान घेण्यासाठी सर्व प्रवसी कार्यकर्त्यांनी गाव चलो अभियान यशस्वी करून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी तयारीला लागण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. ( Bharatiya Janata Party Maval Assembly Worker Workshop Rally Concluded at Talegaon Dabhade )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू असून मोदी साहेबांच्या नेतृत्वात आपला भारत देश विश्र्वगुरू म्हणून जगाच्या पटलावर सिद्ध होत असून या ऐतिहासिक कार्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी जोमाने कार्याला लागण्याच्या सूचना मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिल्या. या कार्यशाळेत कोंडीवडे अ.मा. ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण तळावडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला.पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख, सदस्य, सुपर वॉरियर्स, सर्व प्रवासी कार्यकर्ते, सर्व ग्राम संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील विविध प्रश्नांबाबत युवक काँग्रेसचे वडगावमध्ये आंदोलन; शिक्षक भरती, तलाठी भरती, वीज प्रश्नांबाबत प्रशासनाला निवेदने
– मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वासू हिरा काळाच्या पडद्याआड! आमदार अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन, सरपंच ते 4 वेळा आमदार, ‘अशी’ होती कारकीर्द । MLA Anil Babar Passed Away
– अत्यंत दुर्दैवी! विषबाधेमुळे 149 शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळावर कोसळला दुःखाचा डोंगर, मावळमधील ‘या’ भागात घडली घटना