पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून फेब्रुवारी महिन्यात पक्की अनुज्ञप्ती साठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मध्ये खेड इथे दिनांक 5 आणि 6 फेब्रुवारी, मंचर येथे दिनांक 12 व 13 फेब्रुवारी या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तर, जुन्नर येथे दिनांक 21 व 22 फेब्रुवारी, वडगाव मावळ येथे दिनांक 26 व 27 फेब्रुवारी तर लोणावळा येथे दिनांक 28 व 29 फेब्रुवारी 2024 या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा, 31 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता उपलब्ध होणार आहे, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे. ( Firm License Camp by Pimpri Chinchwad Sub RTO in Maval Taluka February 2024 )
अधिक वाचा –
– ‘नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे’ – रविंद्र भेगडे । Talegaon Dabhade
– गौरवास्पद! महाराष्ट्रातील 11 गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव, मावळ तालुक्यातील ‘या’ किल्ल्याचाही समावेश
– शाब्बास पैलवान..! राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी मावळचा पैलवान वैष्णव आडकर याने पटकावले रौप्यपदक । Wrestler Vaishnav Adkar