महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण (Survey Of Maratha Community) करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाचा कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यत होता. तथापि काही ठिकाणी सर्वेक्षणास आणखी कालावधीची आवश्यकता असल्याने या सर्वेक्षणासाठी दिनांक 02 फेब्रुवारी 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती आयोगामार्फत प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आयोगामार्फत प्रगणकांना सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती मोबाईल अॅप्लीकेशनमधील प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जात आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जात नाही. ( Extension of time for survey of Maratha community and open category citizens )
सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त प्रगणकांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे.
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी घंटानाद आंदोलनाची हाक! NCP Sharad Pawar Faction
– Breaking! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा ब्लॉक; कुठे आणि किती वेळ असणार ब्लॉक, जाणून घ्या । Block On Mumbai Pune Expressway
– ‘अहमदनगर वकील दांपत्य हत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी’, वडगाव लीगल बार असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन । Ahmednagar Lawyer Couple Murder Case