भाजपा पक्ष कार्यालय वडगाव मावळ इथे गुरुवारी (दि. 1) भाजपा मावळ तालुका विद्यार्थी आघाडी आणि ओबीसी आघाडी कार्यकारणी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम पार पडला. मावळ तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिजीत नाटक यांनी मावळ तालुका विद्यार्थी आघाडीची जंबो कार्यकारणी जाहीर केली आहे. यामध्ये 6 उपाध्यक्ष, 3 भाग अध्यक्ष, 2 भाग उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 2 चिटणीस, 5 गण अध्यक्ष, 1 सोशल मिडिया प्रमुख अशी जवळपास 22 कार्यकर्त्यांची कार्यकारणी जाहीर केली असून त्यांना विधानसभा प्रचार प्रमुख रविंद्र भेगडेंच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
त्याचप्रमाणे मावळ तालुका ओबीसी आघाडीचे अध्यक्ष शरद साळुंखे यांनी देखील त्यांची तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे. ज्यामध्ये 8 उपाध्यक्ष, 4 सरचिटणीस, 3 सचिव आणि 4 कार्यकारणी सदस्य नियुक्त करून ओबीसी आघाडीमध्ये नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी दिली आहे. येणाऱ्या काळात सर्व नवनियुक्त पदाधिकारी गावागावात बूथ स्तरावर जाऊन मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या जनकल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य करतील असा विश्वास यावेळी बोलतांना भेगडे यांनी व्यक्त केला. ( maval taluka bjp student alliance and obc alliance jumbo executive announced )
याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ माळी, तालुका सरचिटणीस अविनाश गराडे, अभिमन्यू शिंदे, सभापती संतोष कुंभार, गणेश गायकवाड, एकनाथ पोटफोडे, शत्रुघ्न धनवे , सुनील वरघडे, नंदकुमार शेटे, यादव सोरटे, सतिश राक्षे, युवा वॉरियर्स प्रमुख प्रणेश नेवाळे यांच्यासह युवक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– गुडन्यूज! मावळ विधानसभा मतदारसंघातील महत्वाकांक्षी प्रकल्पांना मिळणार गती, अजितदादांच्या आदेशाने ‘हे’ प्रकल्प लागणार मार्गी । Maval News
– आनंदवार्ता! अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2109 कोटी रुपये निधी वितरणास राज्य सरकारची मान्यता
– महत्वाचे! मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ । Survey Of Maratha Community