मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ सर्व्हिस रोडवर थांबलेल्या वाहनावर भरधाव टेम्पो आदळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 1) पहाटे घडली. टेम्पोचालक सुनील जालिंदर कांबळे (वय 40, रा. कळंबी, ता. विटा, जि. सांगली) आणि विष्णू भीमराव गाडे (वय ५५, रा. राजापूर, ता. तासगाव, जि. सांगली) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सांगलीहून मुंबईकडे द्राक्ष वाहतूक करणारा हा टेम्पो होता. द्रुतगती मार्गावर लोणावळा परिसरात औंढे पुलाजवळ सेवा रस्त्यावर एक वाहन थांबले होते. टेम्पोचालक कांबळे यांचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो सेवा रस्त्यावर थांबलेल्या वाहनावर आदळला. हा अपघात प्रचंड भीषण होता. ज्यात टेम्पोचेही नुकसान झाले आणि दोघांचा मृत्यू झाला.
अपघाताची महिती मिळताच महामार्ग पोलीस, लोणावळा ग्रामीण पोलीस, रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक, आयआरबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोच्या केबीनमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. परंतू उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर औंढे पुल परिसरातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. टेम्पो बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
अधिक वाचा –
– दीडशे शेळ्या-मेंढ्या दगावलेल्या ‘त्या’ गरीब मेंढपाळाला मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात! Maval News
– ‘सरकार झोपलंय..त्यांना जागं करण्यासाठी घंटानाद’, राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, नागरी समस्यांची लांबलचक यादी प्रशासनाला सुपूर्द
– मावळ तालुका भाजपाची विद्यार्थी आघाडी आणि ओबीसी आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान । Vadgaon Maval