तळेगाव दाभाडे शहरात ‘मावळ शेतकरी आठवडी बाजाराचे’ उद्घाटन आमदार सुनिल शेळके आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी (दि. 1) करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट खुल्या बाजारात विकता यावा आणि ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा यासाठी ही उत्तम संकल्पना असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, कृषी पणन मंडळ यांच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा (ATMA) अंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळ पुणे पुरस्कृत श्री स्वामी समर्थ शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या मार्फत तळेगाव दाभाडे शहरात ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत हा शेतकरी आठवडी बाजार सुरु कऱण्यात आला आहे. ( MLA Sunil Shelke inaugurated Maval Shetkari weekly market in Talegaon Dabhade )
ह्या आठवडी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार सुनिल शेळके यांच्या समवेत, सहकारमहर्षी माऊली दाभाडे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगरसेवक अशोकराव भेगडे, कृष्णानाना कारके, सुदर्शन खांडगे, विलासराव काळोखे, नंदकुमार कोतुळकर आदी मान्यवर आणि नागरिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुका भाजपाची विद्यार्थी आघाडी आणि ओबीसी आघाडीची जम्बो कार्यकारिणी जाहीर, पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान । Vadgaon Maval
– गॅस सिलिंडरची अवैधरित्या वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांची खैर नाही! अन्नधान्य वितरण विभागाची मोठी कारवाई । Pune Crime
– पुसाणे गावच्या हद्दीत अवैधरित्या गावठी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा, दोन तरुणांवर गुन्हा दाखल । Maval Crime