व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

मावळ तालुक्यात गेली चार पाच दिवसांपासून मुसळधार मान्सून बरसत आहे. यातही रविवार, सोमवार दोन्ही दिवस अतिवृष्टी सदृश पाऊस झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 7, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
kasarsai dam maval mulshi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यात गेली चार पाच दिवसांपासून मुसळधार मान्सून बरसत आहे. यातही रविवार, सोमवार दोन्ही दिवस अतिवृष्टी सदृश पाऊस झाला. यामुळे सर्वच नद्यांना पूर आला असून गावखेड्यातील, डोंगराळ भागातील ओढे-ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे धरणांतील पाण्याचा येवा वेगाने होत असून वाढला असून धरणांतील पाणीसाठ्यांत वाढ झाली आहे. मावळातील वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी, मळवंडी ठुले, आढले, पाचाणे येथील जलाशये पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पवना धरण पन्नाशी पार –
पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात सध्या पाण्याची आवक वेगाने होत आहे. अवघ्या दोन तीन दिवसांत पवना धरणाने पन्नाशी ओलांडली आहे. मंगळवारी (दि. ७) सकाळी सहा वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात ५५.०७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजच्याच तारखेला तो ७७.२८ टक्के होता. तसेच धरण क्षेत्रात २४ तासांत ४२६ इतका विक्रमी पाऊस झाला आहे.

कासारसाई धरण – पाणीस्थिती व दक्षता सूचना
कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणारा पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे आज (दि. ७ जुलै) रोजी सकाळी ७ वाजता धरणाच्या सांडव्यातून ४,१९४ क्युसेक्सवरून ६,२१६ क्युसेक्स इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. पाऊस सुरू राहिल्यास किंवा वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात आणखी वाढ किंवा घट केली जाऊ शकते.

जाधववाडी लघु पाटबंधारे तलाव –
जाधववाडी ल. पा. तलाव १०० % भरलेला आहे. सदर तलाव हा द्वारविरहित असून, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तलावामध्ये येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे या तलावातून सुधा नदीमार्गे इंद्रायणी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, देहू, आळंदी ते तुळापूर परिसरात नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, नदीपात्रात कोणीही उतरू नये, जनावरे, शेतीपंप, वाहने व इतर साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

वडीवळे धरण –
वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी वडीवळे धरणाच्या सांडव्यावरील दरवाज्यांद्वारे नदीपात्रामध्ये ८,९३५ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात येत आहे. पाऊस सुरू राहिल्यास अथवा वाढल्यास तसेच धरणामध्ये येव्याच्या प्रमाणात वाढ झाल्यास परिस्थितीनुसार सदर विसर्गामध्ये कमी अथवा जास्त बदल करण्यात येऊ शकतो

लोणावळा धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या अनियंत्रित सांडव्यातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा ग्रामीण परिसरात ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू; पर्यटनस्थळांवर सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंध

Next Post

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
Accident insurance coverage worth ten lakhs for journalists in Maval Taluka with special cooperation of MLA Sunil Shelke

मावळ तालुक्यातील पत्रकारांना आमदार सुनील शेळके यांच्या विशेष सहकार्याने दहा लाखांचे अपघात विमा सुरक्षा कवच

August 21, 2026
Young scientists from Maval selected for ISRO-NASA study tour congratulated by MLA Sunil Shelke

मावळमधील बालवैज्ञानिकांची इस्रो-नासाच्या अभ्यासदौऱ्यासाठी निवड ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून अभिनंदन

August 21, 2026
Dhangar Vasti in Shilimb village Maval Taluka lacks road no road access even 80 years after independence

शिळींबची धनगरवस्ती ‘विकासाच्या रस्त्यापासून’ वंचित ; स्वातंत्र्याच्या ८० वर्षानंतरही रस्ता नाही; खांद्यावर दूधाची कावड घेवून रोजची पायपीट सुरूच

August 21, 2026
Woman and newborn baby die after being admitted for delivery at MIMER Hospital in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘मायमर’ हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा आणि नवजात बाळाचा मृत्यू

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.