मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे खंदे समर्थक असलेले सुनिल शेळके (MLA Sunil Shelke) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आमदार सुनिल शेळके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) पार्टीच्या प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती केली आहे. तसे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मागील अनेक दिवसांपासून आमदार सुनिल शेळके यांच्यावर पक्षाकडून अनेक जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत आणि आमदार शेळके पक्षासाठी सातत्याने देत असलेले योगदान पाहता त्यांच्यावर ही संघटनेतील राज्यस्तरीय जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार सुनिल शेळके यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या प्रभारी पदाची जबाबदारी देत असताना त्यांच्याकडून पक्षाची युवक संघटना मजबूत व बळकट करण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत. ( MLA Sunil Shelke appointed as regional in charge of Nationalist Youth Congress Party )
राज्यातील युवक विभागातील सर्व प्रमुखांशी चर्चा व विचारविनिमय करून उपक्रमांचे व कार्यक्रमांचे नियोजन करणे, आगामी काळातील निवडणूका नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राज्यातील सर्व स्तरावरील युवक मोठ्या संखेने आकर्षित होईल यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना व कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
दमदार आणि लोकप्रिय आमदार –
राज्याच्या तत्कालीन मंत्र्याचा पराभव करून आमदार बनलेले सुनिल शेळके हे महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदारांपैकी एक आहेत. तरुणाईत त्यांची वेगळीच क्रेझ आहे. सोबतच अजित दादा यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. 2019 चे बंड असो किंवा गतवर्षीचे पक्षातील सर्वात मोठे बंड असो, सुनिल शेळके हे नेहमीच अजित पवार यांच्या सोबत राहिलेत. म्हणूनच आमदार म्हणून आजवर भरघोस निधी शेळकेंच्या वाट्याला आला. तर, आता त्यांचे पक्षातील राजकीय वजन देखील वाढताना दिसत आहे.
अधिक वाचा –
– द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway
– आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award
– ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade