मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा दुसरा टप्पा सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील सर्व गावे, शहरांतील नागरिकांसाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘यात प्रत्येक गावासाठी एक दिवस निश्चित करण्यात आला असून त्या दिवशी त्या गावाशी संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ज्या तारखेला आपल्या गावाचे नाव असेल त्या दिवशी आपण उपस्थित राहिलात तर शासकीय योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करता येईल. तसेच प्रत्येक नागरिकाला अपेक्षित सहकार्य करुन योजनांचा लाभ मिळवून देता येईल,’ असे आवाहन करण्यात आले आहे. ( Shasan Aplya Dari Abhiyan In Maval Taluka Bhegade Lawns Vadgaon )
शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत एकाच ठिकाणी शासकीय दाखले, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, महिला सक्षमीकरणाच्या योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कालावधी – सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी ते बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी
ठिकाण – भेगडे लॉन्स, वडगाव मावळ
वेळ – सकाळी 9 ते सायं 6 पर्यंत
अधिक वाचा –
– कामशेत – पवनानगर मार्गावर गंभीर जखमी आणि मृतावस्थेत आढळले तरस, अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज । Maval News
– द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway
– आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी आता ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’, जाणून घ्या । Balasaheb Thackeray Arogya Ratna Award