बेबडओहोळ (ता. मावळ) स्थित गंगा पेपर मिल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनीला मावळ तालुका युवक काँग्रेसच्या वतीने निवदेन देण्यात आले आहे. ‘गंगा पेपर मिल कंपनीकडून प्लांटमधील दुषित पाणी हे पवना नदीत सोडले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जिवसृष्टीलाही धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कंपनीला दुषित पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करण्याबाबत निवेदन दिले आहे,’ अशी माहिती तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कौस्तुभ ढमाले उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहे निवेदन?
‘गंगा पेपर मिल इंडिया प्राव्हेट लिमिटेड कंपनी बेबडओहोळ (ता. मावळ). आपण आपल्या कंपनीचे दुषित पाणी पवना नदीत सोडत आहात. वेळोवेळी आपल्याला गावकऱ्यांनी आणि इतरांनी सांगून, विनंती करून देखील आपण आपल्या दुषित पाण्याची योग्य सोय केली नाही. ते पाणी पवना नदीत मिश्रित होऊन तेच दुषित पाणी पुढे गाव, शेती, जनावरे आदींच्या वापरात येते. त्यातून रोगराई पसरत आहे. कंपनीने दुषित पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने कंपनीला टाळे लावण्यात येईल.’ असे निवेदन आणि निवेदनातून इशारा युवक काँग्रेसच्या वतीने कंपनीला देण्यात आला आहे. ( Maval Taluka Youth Congress Letter To Ganga Paper Mill India Private Limited Company at Bebadohol )
अधिक वाचा –
– वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval
– कामशेत – पवनानगर मार्गावर गंभीर जखमी आणि मृतावस्थेत आढळले तरस, अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज । Maval News
– द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway