एकता प्रतिष्ठाण डोणे (ता. मावळ) यांच्या दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनिल शेळके यांनी एकता प्रतिष्ठाण डोणे करत असलेल्या सामाजिक कार्याची सर्व माहिती वाचली. तसेच ग्रामीण भागात एकता प्रतिष्ठाण करत असलेल्या कार्याचे कौतूकही केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष किशोर सातकर, पाचाणे गावचे छबन कडू, पवनमावळ वारकरी सांप्रदायचे विठ्ठल येवले, आढले सोसायटीचे चेअरमन नामदेवराव घारे, चंद्रकांत चांदेकर, पोपट वाडेकर, नथु कारके, सखाराम आरुठे, बाळु घारे, विलास वाघमारे, संदिप लांडगे, राहुल घारे, सागर खिलारी, समीर खिलारी, एकता प्रतिष्ठाणचे संस्थापक बाळासाहेब घारे, उपाध्यक्ष रविंद्र काळभोर, विशाल कारके, सोमनाथ खिलारी उपस्थित होते. ( Calendar 2024 of Ekta Pratisthan Done was released by MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी प्रशासनाची आढावा बैठक; गायरान आणि वनविभागाच्या जागेबाबत महत्वाचे निर्देश
– ‘पवना नदीत दुषित पाणी सोडणे थांबवा, नाहीतर…’, बेबडओहोळ येथील गंगा पेपर मिल कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन । Maval News
– महत्वाचे! मावळ तालुक्यात सोमवारपासून ‘शासन आपल्या दारी’ अभियान, प्रत्येक गाव आणि शहरासाठी दिवस राखीव, वाचा अधिक