स्वारगेट डेपो ते चावसर गाव मुक्कामी एसटी बस सेवा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने वाहतूक व्यवस्थापक सुनील शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. चावसर हे गाव मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागात येते. स्वारगेट डेपोची एसटी बस ही अनेक वर्षांपासून चावसर मुक्कामी असे. भल्या सकाळी ही बस चावसर येथून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होत. त्यामुळे मोरवे, चावसर, शिळींब, वाघेश्वर, आजिवली, जवण अशा गावांतील विद्यार्थी, प्रवासी, नोकरदार यांना पुण्याला जाण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
परंतू मागील अनेक दिवसांपासून ही एसटी बंद करण्यात आली आहे. मुक्कामी एसटी बंद झाल्याने दरदिवशी प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. यातही विद्यार्थी वर्गाला मुळशी तालुक्यातील शाळा, महाविद्यालये वेळेत गाठणे शक्य होत नाही. त्यामुळे ही मुक्कामी एसटी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
युवासेनेते उपजिल्हाधिकारी अमित कुडले, ज्येष्ठ नेते नामदेव टेमघरे, उपतालुका प्रमुख तानाजी हाळनदे, प्रसिध्दी प्रमुख संतोष टेमघरे, आकाश भरेकर, शुभम शिंदे यांच्या वतीने वाहतूक व्यवस्थापकांना हे निवेदन देण्यात आले. ( demand to resume swargate depot to chavsar village st bus soon )
अधिक वाचा –
– माजी उपपंतप्रधान, प्रखर हिंदुत्ववादी नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन । Bharat Ratna to Lal Krishna Advani
– भंडारा डोंगर तीर्थ क्षेत्र विकासासाठी प्रशासनाची आढावा बैठक; गायरान आणि वनविभागाच्या जागेबाबत महत्वाचे निर्देश
– ‘पवना नदीत दुषित पाणी सोडणे थांबवा, नाहीतर…’, बेबडओहोळ येथील गंगा पेपर मिल कंपनीला युवक काँग्रेसचे निवेदन । Maval News