वडगाव सांगवी जोड रस्त्यावरील खापरे ओढ्याच्या सुरुवातीला उतार असलेल्या धोकादायक वळणावर वडगाव नगरपंचायत माध्यमातून संरक्षक लोखंडी कठडे बसविण्यात आले. गेल्या महिन्याभरापूर्वी याच धोकादायक वळणावर एका चारचाकी गाडीवरील गाडीचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता. सुदैवाने जीवितहानी टळली होती. रस्त्यालगत असलेल्या ओढ्याच्या पाणलोट क्षेत्रात अत्यंत खडतर व झाडीझुडपांची दलदल खोलपर्यंत आहे. तर दुसऱ्या बाजूला डोंगर टेकडी आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गेल्या महिन्यात आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून वडगाव नगरपंचायतीने या अरूंद रस्त्याचे रुंदीकरण करत डांबरीकरणचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या भागात तीव्र चढ व उतार असल्याने येथून वाहने सुसाट वेगाने धावत असतात. आणि वेळोवेळी काही छोट्या मोठ्या दुर्घटना घडत असतात. हि बाब या परिसरातील नागरिकांनी मा नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या निदर्शनास आणून देत येथे संरक्षक कठडे बसविण्यात यावे अशी मागणी केली होती. ( work of installing protective iron wall at dangerous bend of Vadgaon Sangvi road completed )
हा रस्ता वडगाव व सांगवी गावाला जोडणारा मुख्य रस्ता असल्याने तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी येथील अपघाती वळणावर संरक्षक कठडे बसविण्यासाठी वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांचे विशेष सहकार्य मिळाल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी या भागात लोखंडी संरक्षक कठडे बसविण्यात आले. यावेळी कामाची पाहणी करत मा नगराध्यक्ष मयूर ढोरे, बजरंग ढोरे, अजित काळे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. यावेळी रस्त्याने ये जा करणाऱ्या वाटसरू नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, अप आणि डाऊनच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द, पाहा संपूर्ण यादी । Block on Pune Lonavala Railway Route
– स्वारगेट डेपोची चावसर गाव मुक्कामी एसटी बस पुन्हा सुरु करण्याची मागणी
– समाज कार्यात अग्रेसर असलेल्या एकता प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते प्रकाशन