मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील उपोषण ते मुंबईकडे पायी मोर्चा, अशा अनेक गोष्टींतून मराठा समाजाची ताकद मनोज जरांगे यांनी एकवटली. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबई इथे आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत राजपत्र काढत मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे सांगितले. मराठा समाजाचा हा मोठा विजय होता आणि मनोज जरांगेंचे योगदान मोठे होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आले म्हणून मावळ तालुक्यातील एका तरुणाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना मुजरा केला आहे. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ येथील मराठा क्रांती मोर्चा चा समन्वयक अमोल ढोरे या मराठा युवकाने जरांगे पाटील यांना धन्यवाद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यासाठी थेट समुद्राचा तळ गाठला. नेमके या तरुणाने काय केले, ते आपण पाहुयात. ( Yoth from Vadgaon Maval hoisted Shivaji Maharaj flag in Lakshadweep sea Maratha Reservation Manoj Jarange Patil )
वडगाव मावळ येथील अमोल ढोरे मराठा क्रांती मोर्चाचा समन्वयक आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण तसेच मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश यासाठी दिलेल्या लढ्याला मोठे यश आले. त्यासाठी आरक्षणाच्या समर्थनार्थ लक्षद्वीप येथील खोल समुद्रात स्कुबा डायविंग करत ढोरे याने समुद्रसपाटीपासून 40 मीटर (130 फूट) खोल समुद्रात जाऊन समुद्राच्या तळाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकावला. तसेच राज्यातील तमाम मराठा बांधवांना व मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मानाचा मुजरा केला.
अधिक वाचा –
– खुशखबर! मावळ तालुक्यातील 11 गावांतील साकव पुलांसाठी तब्बल 5 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर, पाहा संपूर्ण यादी । MLA Sunil Shelke
– वडगाव – सांगवी जोडरस्त्यावरील धोकादायक वळणावर संरक्षक लोखंडी कठडे बसवण्याचे काम पूर्ण । Vadgaon Maval
– पुणे जिल्ह्याचा नवा विक्रम! चालू वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप, पाहा आकडेवारी । Pune News