पवनानगर : शिक्षक आजीवन शिक्षक असतो तो कधीही माजी होत नाही, फक्त शासकीय नियमाने तो सेवानिवृत्त होत असतो, असे मत माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी व्यक्त केले. ॲड पु. वा. परांजपे विद्यालयाचे शिक्षक, उत्तम निवेदक, निसर्गप्रेमी, उत्तम संघटक, पर्यवेक्षक पांडुरंग संभाजीराव कापरे यांचा सेवापूर्ती समारंभ तळेगाव दाभाडे येथे पार पडला. त्यांनी शिक्षक म्हणून 32 वर्ष एवढा प्रदीर्घ काळ सेवा बजावली. ( adv pv paranjpe vidya mandir talegaon dabhade teacher pandurang kapre service completion ceremony )
पुढे बोलताना गुंजाळ म्हणाले की, शिक्षकी पेशा हा नोकरी म्हणून न करता प्रत्येक शिक्षकाने ते एक व्रत आहे अशी सेवा करावी. सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमासाठी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव, शालेय समिती अध्यक्ष नंदकुमार शेलार, सदस्य महेशभाई शहा, सोनबा गोपाळे, यादवेंद्र खळदे, दामोदर शिंदे, शालेय समितीचे सदस्य अशोक काळोखे, ताणतणाव मुक्तजीवन योगा शिक्षक अशोक देशमुख, पंचायत समिती विस्तार अधिकारी नीलकंठ बोरुडे, प्रशांत भागवत, प्रा सत्यजित खांडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिपक हुलावळे, रोटरी क्लब ऑफ निगडी रो गुरदीपसिंग माजी सभापती श्रीगोंदा पंचायत समिती बाळासाहेब खेतमाळीस सर्व उपस्थित मान्यवरांच्या समवेत शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
यावेळी बोलताना संसथेचे सचिव संतोष खांडगे म्हणाले की, कापरे सर हे संस्थेतील मनमिळावू, उत्तम प्रशासक व सर्वांना संभाळून घेऊन प्रशासन त्यांनी केले म्हणून ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. यावेळी बोलताना संस्थेचे सहसचिव नंदकुमार शेलार म्हणाले की, एक निसर्गप्रेमी शिक्षक, उत्तम शेतकरी, कुटुंबवत्सल नागरिक, दिलदार मित्र या सर्व जबाबदारी सांभाळून उत्तम शिक्षक कसा असावा हा आदर्श कापरे सरांकडुन इतर शिक्षकांनी घेण्यासासारखा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी कापरे सर यांचा जीवनपट सांगितला. मानपत्राचे वाचन दीप्ती बारमुख यांनी केले. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सरांच्या विषयी मनोगते व्यक्त केली. विद्यालयातील अध्यापिका दुर्गा भेगडे, उमेश इंगुळकर, भारत काळे, समीर गाडे, अलका आडकर यांनी मनोगत व्यक्त केले.
मुलगा हर्षवर्धन कापरे याने वडिलांवर एक कविता सादर केली. सूनबाई ऋतुजा कापरे यांनी मनोगत व्यक्त केले. शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी पांडुरंग कापरे या पुढील आयुष्य एक उत्तम प्रगतीशील शेतकरी म्हणून घालवणार आहे, यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ यांनी त्यांना सेवापूर्तीच्या निरोगी आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा आवटे, सुजाता कातोरे यांनी केले. स्वागत वैशाली कोयते यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ढमढेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पुण्यात तलवारीने दहशत निर्माण करून पसार झालेल्या आरोपीला तुंग किल्ला परिसरातून अटक
– औरंगाबादमधून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीची कामशेत पोलिसांकडून चिखलसे गावाजवळ सुटका; अट्टल आरोपी अटकेत
– ‘आमच्या शेतकऱ्यांचे रक्तरंजित पाणी तुम्हाला प्यायचे आहे का?’, पवना जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा, नाहीतर…