लोणावळा येथील व्हिपीएस विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी साहसी खेळांचे धडे या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्याकडून विविध विभागांमध्ये चालणारे कार्य आणि त्यामध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन देखील करण्यात आले. ( Adventure Sports Lessons For VPS High School Students By Shivdurg Mitra Lonavala )
प्राचार्या मॅडम यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आनंद गावडे यांनी सर्व शिवदुर्गच्या सदस्यांची ओळख करुन दिली. सर्वांच्या वतीने उपाध्यक्ष महेश मसने यांनी शिवदुर्गचा सत्कार स्विकारला. यावेळी शिवदुर्गच्या रेस्क्यू विषयी फिल्म दाखवण्यात आली. शिवदुर्ग संस्था स्थापनेपासून संस्थेची वाटचाल आणि शिवदुर्ग क्लायबिंग, शिवदुर्ग रेस्कु, शिवदुर्ग ॲनिमल, शिवदुर्ग सायकलींग, शिवदुर्ग फिटनेस, शिवदुर्ग सांस्कृतिक विभाग असे सहा विभागात काम कसे चालते याची माहिती देण्यात आली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आर्टिफिशियल वॉल क्लायबींग हा खेळ ऑलिंपिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने शिवदुर्ग मुला मुलींची तयारी करवून घेत आहेत. तसेच अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होता येते. अनेक कोर्सेस करता येतात. करियर करण्यासाठी हा पण एक पर्याय असु शकतो. वेटलिफ्टींग पॉवरलिफ्टींग तसेच सायकलिंग या खेळातही विद्यार्थ्यांना संधी आहेत. ॲनिमल ट्रीटमेंट करणे, सांस्कृतिक विभागात नृत्य कला या मध्ये कलाकारांना संधी आहे.
रेस्कु विषयक फिल्म, क्लायबिंग फिल्म दाखवून मुलांना आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला गेला. तसेच हायलाईन आणि रॅपलींग सारख्या साहस क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. सामाजिक बांधिलकी निर्माण होणे, मुलांच्या हातातील मोबाईल दूर गेला पाहिजे आणि मुले मैदानात आली पाहिजे, हा यामागचा उद्देश होता.
इयत्ता दहावीची तन्वी आहेर हिने रॅपलींगचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. ओम हरसुले आणि आयुष वर्तक यांनी हायलाईनचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. गानू मॅडम – प्राचार्या, महेंद्रकर सर – उपमुख्याध्यापक, रसाळ सर – पर्यवेक्षक, जोशी सर, कुलकर्णी सर, गिरमकर सर, चोणगे सर, दहिफळे सर, सुर्यवंशी सर, म्हात्रे मॅडम, रत्नाकर मॅडम, कदम सेवक या सर्वांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, त्यांचे शिवदुर्गकडून आभार मानण्यात आले.
शिवदुर्गचे महेश मसने उपाध्यक्ष, सुनिल गायकवाड सचिव, आनंद गावडे सह सचिव, अनिल सुतार संचालक, सचिन गायकवाड जेष्ठ गिर्यारोहक, समिर जोशी, ओंकार पडवळ, ओम हरसुले, आयुष वर्तक, आदित्य पिलाने, हर्ष तोंडे, सिध्देश निसाळ, दुर्वेश साठे, अजय शेलार, निकीत म्हाळसकर, यश सोनावणे
या सदस्यांनी सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडावर महाशिवरात्र जल्लोषात साजरी! पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या शिवघोषाने दुमदुमला परिसर
– सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेजमध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी किरकोळ कारणावरुन तुफान राडा, 9 जणांवर गुन्हा