मावळ तालुक्यातील सुदुंबरे मध्ये सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनियरिंग इथे शिवजयंतीच्या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. याबाबत ओम विजय शिंदे (वय 18, व्यवसाय शिक्षण, रा. बोराटे आळी नागेश्वर मंदिराचे मागे, मोशी गावठाण, ता. हवेली जि. पुणे) याने तळेगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
फिर्यादी ओम शिंदे याने दिलेल्या फिर्यादीवरुन तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एकूण 9 आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 143, 147, 149, 324, 323, 506 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) / 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 1) राज बेहरा, 2) ओंकार बोरकर, 3) संस्कार गाडे, 4) विनय गाडे, 5) साहिल बोरकर, 6) प्रतिक गाडे आणि इतर 2 ते 3 व्यक्ती सर्वजण राहणार सुदूंबरे (तालुका मावळ, जिल्हा पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान सिद्धांत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सुदुंबरे च्या आवारात सुदूंबरे गावाच्या (ता. मावळ जि. पुणे) चौकामध्ये हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा फिर्याद दाखल करण्यात आली. ( Talegaon MIDC Police Registered Case Against 9 Persons For Fighting Over Minor Reason During Shiv Jayanti Program At Siddhant College In Sudumbare Maval )
हेही वाचा – सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी आरोपी यांनी कॉलेजमध्ये शिवजयंती कार्यक्रमावेळी शोभकामाचे पेपर प्लास्टिंग मशिनला लाथ मारल्याचा जाब विचारल्यावरुन चिडून जाऊन फिर्यादीला हाताने आणि फिर्यादीच्या इतर 3 मित्रांना हाताने आणि बांबूच्या काठीने मारहाण करुन जखमी केले, अशी फिर्याद देण्यात आली आहे. यातील एकाही आरोपी अटक करण्यात आलेली नसून या प्रकरणी पुढील तपास सपोनि पांडे हे करत आहेत.
अधिक वाचा –
– किल्ले लोहगडावर महाशिवरात्र जल्लोषात साजरी! पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या शिवघोषाने दुमदुमला परिसर
– पवना शिक्षण संकुलात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न, पारंपारिक वेषातील बालगोपाळांनी वेधले सर्वांचेच लक्ष