सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करुन सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांत 2 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी मुंबई – बेंगलोर हायवेवर किवळे ब्रीजजवळ हा प्रकार घडला. ( Dehu Road Police Case Registered Against 2 Women For Making Obscene Gestures In Public Places )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास मुंबई – बेंगलोर हायवेवर किवळे ब्रीजच्या बाजुला असलेल्या द्वारका लॉजसमोर दोन महिला वेश्या व्यावसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करुन शब्द उच्चारून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करुन सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होईल असे कत्य करत होत्या, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते विकास दत्ता घोरपडे (वय 24, तळेगाव दाभाडे, ता. मावळ जि. पुणे) यांनी देहूरोड पोलिसांत केली.
त्यानुसार दोन महिलांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम – 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मपोहवा पटेकर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– अपघात ब्रेकिंग! तळेगाव-चाकण रोडवर ट्रक आणि ऑटो रिक्षाचा अपघात, 2 प्रवासी जखमी
– वडगावमध्ये आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी मुख्य रस्त्यावर चारचाकी वाहनांना बंदी का घालू नये?