व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महानगरपालिका निकालानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार ; निवडणूक आयोगाची महत्वाची माहिती

केवळ 14 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता - पाहा यादी

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 15, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Maharashtra State Election Commission

File Image


Dainik Maval News : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज ( दि. 15 ) राज्य निवडणूक आयोगाने केली. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेत, सर्व 29 महापालिकांमध्ये निवडणूक प्रक्रिया कशी पार पडेल, याची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान तर दिनांक 16 जानेवारी रोजी मत मोजणी होणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षे रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका कधी जाहीर होणार? हा प्रश्न अनुत्तरित असून याबाबत राज्य निवडणुक आयोगाने महत्वाची माहिती दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर करत असताना मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जिल्हा परिषदांच्या निवडणुकीबाबतही अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीच्या आत राज्यातील केवळ 14 जिल्हा परिषदांचीच निवडणूक घेणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरक्षणाचा पेच –
राज्यातील एकूण 34 जिल्हा परिषदा असून त्यापैकी भंडारा आणि गोंदियामध्ये निवडणूक नियोजित नाही. उर्वरित 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मात्र, त्यापैकी तब्बल 18 ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 50 टक्केंच्या आत असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक घेता येणार आहे. त्यानुसार निवडणूक आयोग नव्याने आरक्षण सोडत काढून 20 जिल्हा परिषदांसह सर्व 32 ठिकाणी निवडणूक घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आज सोमवारी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केवळ आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या ठिकाणीच निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे जाहीर केले. त्यामुळे उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार?
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव, अहिल्यानगर.

कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडणार?
आदिवासीबहुल नंदुरबार 100 टक्के, पालघर 93 टक्के, गडचिरोली 78 टक्के, नाशिक 71 टक्के, अमरावती 66 टक्के, यवतमाळ 59 टक्के यांचा समावेश आहे. मात्र या जिल्ह्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या अधिक असल्याने या जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण लागू आहे. याशिवाय धुळे 73 टक्के, चंद्रपूर 63 टक्के, अकोला 58 टक्के, नागपूर 57 टक्के, ठाणे 57 टक्के, गोंदिया 57 टक्के, वाशिम 56 टक्के, नांदेड 56 टक्के, हिंगोली 56 टक्के, वर्धा 54 टक्के, जळगाव 54 टक्के, भंडारा 52 टक्के, लातूर 52 टक्के, बुलडाणा 52 टक्के या जिल्हा परिषदांमध्येही 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण वाढले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी
– मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरणी विद्यमान तहसीलदार सहीत 11 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन
– 2028 पर्यंत पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम पूर्ण होणार ; रिंग रोड सह विविध रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर
– मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : नक्की काय कारवाई होणार? पाहा महसूलमंत्री बावनकुळे काय म्हणाले


Previous Post

मावळमधील औंढे खुर्द येथे राज्य उत्पादक शुल्क विभागाची मोठी कारवाई ! शेकडो लीटर गावठी दारू जप्त, दोन आरोपी अटकेत

Next Post

मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या निलंबनाचा मावळातील महसूल कर्मचारी संघटनेकडून निषेध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Illegal mining case in Mangrul maval Revenue Employees Association protests suspension of Tehsildar Mandal Officer Talathi

मंगरूळ येथील अवैध उत्खनन प्रकरण : तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या निलंबनाचा मावळातील महसूल कर्मचारी संघटनेकडून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
Talegaon Chakan Shikrapur Highway

तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक

March 18, 2026
Ekvira-Devi

Karla Ekvira Devi : आई माऊलीचा उदो उदो !! कार्ला येथील आई एकवीरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये चैत्री यात्रेची जोरदार तयारी

March 18, 2026
Change alignment of Pune-Hyderabad High Speed ​​Rail Corridor crossing Bhandara Dongar MP Shrirang Barne in Lok Sabha

श्रीक्षेत्र भंडारा डोंगराला छेदून जाणाऱ्या पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरची अलाईनमेंट बदला ; खासदार बारणे यांची लोकसभेत मागणी

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.