Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची बदली होऊन एक महिना उलटला तरीही अद्याप त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही.
- सध्या खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडगे यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार आहे. परंतु, खेड ते लोणावळा हे अंतर अधिक असल्याने त्यांनाही कार्यपूर्ती करताना अडचण होत आहे.
दरम्यान लोणावळा उपविभाग सारख्या महत्वाच्या ठिकाणी नव्या अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.
लोणावळा उपविभागात पुणे ग्रामीण पोलीस दलाची वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर अशी चार ठाणी असून हा परिसरही विस्तीर्ण आहे. त्यामुळे महत्वाच्या याठिकाणी नव्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती होणे गरजेचे आहे.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस दलात लोणावळा विभागाची उपविभागीय अधिकारी पदाची खुर्ची महत्वाची मानली जाते. या जागेवर येण्यासाठी अनेक बडे अधिकारी इच्छूक असून संबंधितांनी तशी फिल्डिंगही लावल्याचे बोलले जात आहे. अनेक अधिकाऱ्यांनी या पदासाठी मोर्चेबांधणी केली असून राजकीय वशिलेबाजी सुरू असल्याचीही चर्चा होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्याचा विकास व्हावा ; शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळावा – आमदार सुनिल शेळके
– मावळ तालुक्यातील इंदुरी येथील भुईकोट किल्ल्यावर 61 फुटी भगव्या ध्वजाचे लोकार्पण । Maval News
– मोठी बातमी : श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर मोरे यांची निवड ; चुरशीची लढतीत 63 मतांनी विजयी । Dehu News