Dainik Maval News : महाराष्ट्र शासन कृषि विभागातील क्षेत्रीय स्तरावर असणारा महत्वाचा घटक म्हणजे कृषिसहाय्यक. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणारा कृषि विभागातील कर्मचारी. परंतु कृषि विभागात कायम दुर्लक्षित घटक म्हणजे कृषि सहाय्यक.
मागील दहा वर्षापासून कृषिसहायक आपल्या मागण्या शासन दरबारीं मांडत आहेत, परंतु कायम खोटी आश्वासने देऊन शासनाने फसवणूक केली आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगाम तोंडावर आला असताना महाराष्ट्र मधील सर्व कृषिसहाय्यकानी बेमुदत संप पुकारला आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा आहे. तरी शासनाने तात्काळ मागण्या मान्य करून कृषिसहाय्यकाना न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषि सहाय्यकाच्या प्रमुख मागण्या कृषिसेवक तीन वर्षाचा कालावधी रद्द करणे, ऑनलाईन काम करण्यासाठी लॅपटॉप मिळावा, कृषिसहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषि अधिकारी करणे, ग्रामस्तरावर मदतनीस मिळणे, निविष्टा वाटपाचे मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही व्हावी, नैसर्गिक आपतीचे पंचनाम्याची कार्यपद्धती तयार करण्यात यावी, आकृतिबंध तात्काळ मंजूर करण्यात यावा इ. ह्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्यात, असे कृषि सहाय्यक विकास गोसावी यांनी सांगितले.
वडगाव मावळ तालुक्यातील सर्व कृषिसहाय्यक बेमुदत संपात सहभागी आहेत. कृषिसहाय्यकांच्या मागण्या मान्य होईपर्यत संप चालू राहणार आहे. शासनाने तात्काळ मागण्या मान्य करून कृषिसहाय्यकाना न्याय द्यावा. – घनश्याम दरेकर, तालुका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना शाखा मावळ
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी
– ‘नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू’, खासदार श्रीरंग बारणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना
– मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
– मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश