देशात सध्या लोकसभा निवडणूकांचा महौल बनू लागला आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. यातही ज्या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि राजकीय आखाड्याची जोमाने सुरुवात केली आहे, असे दोन मतदारसंघ म्हणजे एक मावळ लोकसभा मतदारसंघ आणि दुसरा शिरूर लोकसभा मतदार संघ. महाविकासआघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांत या दोन्ही मतदारसंघामुळे घमासान होण्याची चिन्हे दिसत आहेत. यात एक प्रमुख पक्ष आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट.
राम मंदिराच्या उद्घाटनानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने, सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहे. त्यातच मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आणि त्यातही अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पार्थ पवार हे पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असून मावळ किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. याबाबत खुद्द अजित पवार यांनाच पुण्यातील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर अजितदादांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे स्पष्ट उत्तर दिले. तसेच येत्या काळात महायुतीचे जागावाटप लवकरच करू, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभेच्या जागावाटपासाठी भाजप तसेच शिंदे गटातील नेते आणि आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ. वेगवेगळे कार्यकर्ते सहकारी आपापल्या परीने भूमिका मांडत आहेत. परंतु महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आणू, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. मावळबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आम्ही एकत्रित चर्चा करू, तसेच समज गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आम्ही दुर करूअसेही अजित पवार यांनी सांगितले. ( Ajit Pawar reaction On Parth Pawar Candidacy In Maval Or Shirur Lok Sabha Constituencies )
अधिक वाचा –
– विजय जाधव यांच्या उपस्थितीत मावळ तालुका काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक; संघटनात्मक बांधणीसाठी खास नियोजन
– मावळच्या विकासासाठी ‘भारत विकास ग्रुप’ कंपनीची आमदार सुनिल शेळकेंना साथ; इंद्रायणी भात पीक वाढीसाठी करणार प्रयत्न
– महाराष्ट्र राज्य क्रिकेट संंघात निवड झाल्याबद्दल चैतन्य कोंडभर याचा बाळा भेगडे यांच्या हस्ते सन्मान । Chaitanya Kondbhar