व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्याला नाट्य संमेलनाच्या सांगता समारंभाचा मान! मंडपाचे भूमिपूजन आणि रंगमंच, प्रवेशद्वाराचे नामकरण संपन्न । Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan

नाट्यसंमेलनाच्या भव्य प्रारंभाप्रमाणेच सांगता समारंभही दिमाखदार करणार - आमदार सुनिल शेळके Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 19, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
natya-sammelan-talegaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘मोठी परंपरा असलेल्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता मावळमधील ( Maval Taluka ) तळेगाव दाभाडे शहरात (Talegaon Dabhade) होत आहे. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. नाट्यसंमेलन ज्या भव्यतेने साजरे झाले त्याची सांगताही त्याच दिमाखात साजरी करण्याचाच आमचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने येत्या बुधवारी (दि. 24 जानेवारी ) होणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या होणाऱ्या कार्यक्रमास मावळ व पुणे जिल्ह्यातील नाट्यरसिक आणि समस्त नागरिकांनी उपस्थित राहून हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करावा,’ असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) पुणे जिल्ह्यातील ( Pune District ) सांगता समारंभ (Concluding Ceremony) तळेगाव शहरात होत असून त्याच्या मंडपाचे भूमिपूजन तसेच व्यासपीठ आणि प्रवेशद्वाराचे नामकरण गुरुवारी (दि. 18) संपन्न झाले. मावळचे आमदार सुनील शेळके, नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे- विश्वस्त सुरेश साखवळकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. पिंपरी चिंचवडचे नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कलापिनीचे नाट्य परिषद तळेगाव शाखेचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे, नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे तसेच तळेगावातील युवा नेते गणेश खांडगे, जेष्ठ नेते बबनराव भेगडे यांनी आमदार शेळके यांच्यासमवेत समारंभस्थळी शुभारंभाची कुदळ मारून, श्रीफळ वाढवून हा कार्यक्रम संपन्न झाला.

  • मुख्य कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार शेळके यांनी या कार्यक्रमाचे औचित्य राखीत नाट्यरसिकांना वरील आवाहन केले. या दोन्ही कार्यक्रमांना वरील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी तळेगाव नगरी ही सर्व कला चळवळीची गंगोत्री असून येथील जेष्ठ कलाकार, मान्यवर संस्था म्हणजे आमची विद्यापीठे आहेत. त्यांच्याकडूनच आम्ही शिकलो. त्यांचे ऋण मानूनच भविष्यात नाट्यसंकुल व विविध कलांना सामावून घेणारे कलामंदिर निर्माण करता येईल का, असाच आमचा प्रयत्न असेल असे स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी आमच्या नाट्यसंमेलन व एकूणच उपक्रमांना भरभरून दाद दिली. त्याचाच कळस आपणास तळेगावात चढवायचा आहे. असे सांगून तळेगाव शाखेचा गौरवपूर्ण कार्यक्रमांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांनी सर्व धर्म, पंथ व भिन्न अभिरुचींना एकत्र आणणारे माध्यम कला असते. ती महाराष्ट्रात व त्यातही तळेगावात फुलली, बहरली असून ही अभिमानास्पद बाब असल्याचे सांगितले. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी तळेगाव ही नाट्यरसिकांची, कलाकारांची खाण आहे. यापुढील तळेगावातील नाट्यसंमेलनाची ही नांदीच असल्याचे स्पष्ट केले.

नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी 100 व्या नाट्यसंमेलनाच्या पुणे जिल्हा स्तरावरील सांगता समारंभाची रूपरेषा स्पष्ट केली. 24 जानेवारी, बुधवारी दुपारी 4 वाजता नाट्यदिंडी, संध्याकाळी 6 वाजता मुख्य सांगता समारंभ व त्यानंतर ‘चला हवा येऊ द्या’ हा जगप्रसिद्ध कार्यक्रम या मालिकेचे सर्व लोकप्रिय कलाकार सादर करणार आहेत. तसेच हा समारंभ होत असलेल्या मुख्य प्रवेशद्वारास ‘श्रीमंत उमाबाई दाभाडेसाहेब’ व रंगामंचास तळेगावचे मानबिंदू असलेले जेष्ठ साहित्यिक कै. गो. नी. दांडेकर यांचे नाव देण्यात आले आहे, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. समारंभाच्या यशस्वितेची तसेच मुख्य प्रायोजकत्वाची जबाबदारी आमदार सुनील शेळके यांनी घेतल्याने आपण हा सांगता समारंभ तळेगाव मावळला शोभेल असा करू शकणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.

प्रारंभी आमदार शेळके यांच्या हस्ते नटवराला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. सूत्रसंचालन तळेगाव शाखेच्यावतीने होत असलेल्या नाट्य संमेलनाची सांगता समारंभाचे माध्यम समन्वयक प्रसाद पानसे यांनी केले. आभार नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे संचालक राजेश बारणे यांनी मानले. समारंभास नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे संचालक तेजस धोत्रे, संजय वाडेकर, सुरेश दाभाडे, क्षिप्रसाधन भरड, प्रसाद मुंगी, संग्राम जगताप, डॉ. नयना डोळस, ब्रीजेन्द्र किल्लावाला, गोपाळ परदेशी, हरिश्चंद्र गडसिंग, डॉ मिलिंद निकम या संचालक मंडळाबरोबर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नाट्यपरिषद तळेगाव शाखा अध्यक्ष सुरेश धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सर्व संचालक मंडळ व हर्षल आल्पे, योगंधरा बढे, अमित बांदल, विनोद टकले, मिनल रणदिवे यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा –
– Breaking! द्रुतगती मार्गावर भल्या पहाटे गंभीर अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू । Mumbai Pune Expressway Accident
– आदिवासींच्या उत्थानासाठी ‘पीएम-जनमन’ महाअभियान । PM Janman Abhiyan
– ’22 जानेवारीला वडगावमधील मांस व मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवा’, राष्ट्रवादीकडून पोलिस आणि नगरपंचायत प्रशासनाला निवेदन


dainik maval jahirat

Previous Post

पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाळा भेगडे आणि पदाधिकाऱ्यांकडून तळेगावमधील मंदिरांची स्वच्छता । Talegaon News

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा प्रचंड यशस्वी; जागतिक आर्थिक परिषदेत तब्बल 3 लाख 53 हजार कोटींहून अधिकचे सामंजस्य करार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-EKNATH-SHINDE

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावोस दौरा प्रचंड यशस्वी; जागतिक आर्थिक परिषदेत तब्बल 3 लाख 53 हजार कोटींहून अधिकचे सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Ghatsthapana observed amidst devotional atmosphere in temples across villages of Maval Taluka

मावळ तालुक्यातील गावोगावी मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात “घटस्थापना”

October 12, 2026
Pune Zilla Parishad ranks second in state under Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

October 12, 2026
Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.