Dainik Maval News : बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू (Akshay Shinde Encounter) झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी अक्षय शिंदेला पोलीस तळोजा रुग्णालयातून घेऊन जात अक्षय शिंदेनी पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या घटनेत पोलीस देखील जखमी झाले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गोळीबारानंतर कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अक्षय शिंदेला नेण्यात आले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. “बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे याने, पोलिसांकडून बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांच्या गाडीतच गोळीबार केला,” असे पोलिसांनी सांगितले.
“या चकमकीत पोलिसही जखमी झाले होते, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्याला उपचारांसाठी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं,” असही पोलिसांनी सांगितले.
असा झाला एन्काऊंटर –
ठाणे क्राइम ब्रॅचच्या टीमने आज अक्षयला तळोजा जेलमधून ताब्यात घेतले होते. तसेच त्याला दुपारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी करण्याकरीता घेऊन जात होते. यावेळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोहोचताच अक्षयने पोलिसांजवळील बंदूक हिसकली आणि पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ( Akshay Shinde Encounter badlapur sexual assault case accused attempt to suicide )
Maharashtra | Akshay Shinde, the accused arrested in the case of exploitation of innocent girls in Badalpur school, snatched the police’s weapon and opened fire on the police in the vehicle. Police officers were also injured in this, Akshay Shinde was shot in the police…
— ANI (@ANI) September 23, 2024
बदलापूर अत्याचार प्रकरण –
बदलापुर येथील एका शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर बदलापूर मध्ये नागरिकांनी रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. या एसआयटीच्या टीमने या प्रकरणाचा तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. असे असतानाच अक्षय शिंदे याच्या दुसऱ्या पत्नीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या विरोधात अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
अधिक वाचा –
– कल्हाट, पवळेवाडी गावातील विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; गावकऱ्यांकडून आमदारांचे जल्लोषात स्वागत । Maval News
– आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कुसगाव बुद्रुक येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले राजगडाची भव्य प्रतिकृती, आमदार शेळकेंकडून कौतूक