व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News

आंदर मावळ विभागातील टाकवे बुद्रुक परिसरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात महिला, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 23, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Power Issue Warning to block the office of Mahavitaran

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील टाकवे बुद्रुक परिसरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात महिला, नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येत्या पंधरा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

टाकवे शहर वीज ग्राहक कृती समितीच्या वतीने याबाबतचे निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके, गट विकास अधिकारी पंचायत समिती वडगाव मावळ, महावितरणचे अधिकारी आणि महसूल नायब तहसीलदार अविनाश पिसाळ यांना देण्यात आले आहे. कृती समितीचे राजू शिंदे, माजी उपसरपंच स्वामी जगताप, जीप संघटना अध्यक्ष उल्हास असवले, माजी चेअरमन दत्ता घोजगे, माजी चेअरमन दिलीप आंबेकर आदी यावेळी उपस्थित होते.

टाकवे बुद्रुक हे गाव आंदर मावळातील चाळीस गावांची मुख्य बाजार पेठ आहे. त्यामुळे नागरिकांची येथे नियमित रहदारी असते. मात्र, विजेच्या लपंडावामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक व्यवहार, ई सेवा केंद्र, टाकवे शहराचा पाणीपुरवठा, शेतकऱ्यांच्या मोटारी, लघु उद्योग आदी सर्व बाबींवर याचा विपरीत परिणाम होत आहे.

टाकवे बुद्रुक परिसरात अनेक वर्षांपासून वीज पुरवठ्याची समस्या गंभीर आहे. त्या अनुषंगाने वडगाव मावळ महावितरण कार्यालयात अनेक वेळा ग्रुप ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांच्या मार्फत पत्र व्यवहार केले आहेत. काही कामे त्यांनी हाती घेतली आहेत. मात्र काही कामे अपूर्ण राहिली आहेत. यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून टोलवा – टोलीची उत्तरे मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तरी महावितरण विभागाने राहिलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागाची राहील असे माजी सरपंच भूषण असवले म्हणाले.

माघील काही महिन्यांपासून येथे विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. परिणामी महिला व नागरिक हैराण झाले आहेत. महिलांना पहाटे उठून घरकाम आवरून काहींना कामाला जायची घाई असते. त्यात मुलांची शाळा, पुरुषवर्गाला कामाला जाण्याची गडबड यात वीज सारखीच गायब होत असते. यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे महावितरण कर्मचारी कोणी लक्ष देत नाही. दाद मागायला महिलांनी तरी कुठे जायचे? समस्यांचे निवारण करुन नागरिकांना न्याय द्या, एवढीच माफक अपेक्षा असल्याचे महिला दक्षता समिती अध्यक्षा मंगल टेमगिरे म्हणाल्या.

अधिक वाचा –
– कल्हाट, पवळेवाडी गावातील विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; गावकऱ्यांकडून आमदारांचे जल्लोषात स्वागत । Maval News
– आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कुसगाव बुद्रुक येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले राजगडाची भव्य प्रतिकृती, आमदार शेळकेंकडून कौतूक


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News

Next Post

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू, असा झाला एन्काऊंटर । Akshay Shinde Encounter

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Akshay Shinde Encounter

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू, असा झाला एन्काऊंटर । Akshay Shinde Encounter

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.