व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 19, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तब्बल 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1996च्या बॅचचा स्नेहमेळावा, शाळेच्या पटांगणात मैत्रीचा रौप्यमहोत्सव

वडगाव मावळमधील न्यू इंग्लिश स्कूलमधील सन 1996 मधील माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. यावेळी शिक्षकांसह शाळेच्या माजी विद्यार्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 30, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Alumni-Get-Together

Photo : Ananta Kude


वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील एकाच बाकावर बसलेले आणि भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील सवंगडी स्नेहसंमेलन मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आले. शिक्षकांप्रती असलेली आदरयुक्त भीती अद्यापही चेहऱ्यावर कायम ठेवत उत्साह, आनंद आणि कौतुकाची भावना मनात ठेवत न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मैत्रिचा रौप्य महोत्सव रंगला. ( Alumni Get Together In New English School At Vadgaon Maval )

सन 1996 मधील न्यू इंग्लिश स्कूलमधील माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा रविवारी 26 नोव्हेंबर रोजी नुकताच संपन्न झाला. मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्याच्या निमंत्रणास मान देत तत्कालीन शिक्षक ए. डी. निकम, वाय. एन. अहीरे, रामचंद्र काटवटे, पी. एम.शेख, एस. व्ही. उबाळे, शिक्षिका व्ही.आर. काटवटे, एस.एम. सुर्यवंशी, रेखा पाटील-इंगळे, शिक्षकेतर कर्मचारी मधुकर वाघवले, वनराज ढोरे, लोंढे मामा, भोयरे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आत्माराम मोरे आदींनी उपस्थिती लावले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

सन 1996 मधील इयत्ता दहावीच्या बॅचचे जवळपास 72 विद्यार्थांनी कार्यक्रमास हजेरी लावली. प्रथम शाळेतील हयात नसलेले माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांनंतर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. पंचवीस वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर उत्सुकता, आनंद, मस्ती अशा संमिश्र भावना होत्या.

समीर सय्यद, अनिल ढोरे, किरण म्हाळसकर, अनंता कुडे, दीपक भालेराव, भाऊ म्हाळसकर, स्वप्नील जाधव, दशरथ जांभुळकर, नामदेव वारिंगे, मनिषा वाघमारे, विजया हवालदार, रेखा ओव्हाळ, रुपाली शिंदे आदी माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हा स्नेहमेळावा संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. सामाजिक बांधिलकी जपत असताना शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तसेच शालेय कमानीचे रंगकाम करून नूतनीकरण केले. ( Alumni Get Together In New English School At Vadgaon Maval )

हेही वाचा – खळबळजनक! वडगाव मावळमधील दुय्यम निबंधक कार्यालयात आत्म’हत्येचा प्रयत्न

shivraj mobile kamshet

आपल्या निवृत्तीनंतरही अहीरे सर यांनी विद्यार्थांना समाजामध्ये कसे राहावे, कसे वागावे याचे धडे दिले. शेख सर यांनी गायलेल्या ‘सजन रे झुठ मत बोलो…खुदा के पास जाना हे’ या गाण्याला विद्यार्थ्यांसह सहकारी शिक्षकांनीही दाद दिली. काटवटे सर, उबाळे सर, सुर्यवंशी मॅडम, पाटील मॅडम यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. सुधीर कुंभार, बी.एम. सरकाळे, शोभा ढमढेरे या शिक्षकांनी कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना आशिर्वाद दिले.

पंचवीस वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी यापूढेही संपर्कात राहत गरजेनुसार शाळेस आवश्यक ती मदत करण्याचे मनोदय व्यक्त केला. शाळा भेट उपक्रमातंर्गत विद्यालयाचा नामफलक रंगरंगोटी व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण केल्यामुळे सध्या शाळेमध्ये असलेल्या मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ( Alumni Get Together In New English School At Vadgaon Maval )

अधिक वाचा –

– व्हिडिओ – अग्निप्रलयापासून थोडक्यात वाचले र. वा. दिघे वाचनालय, वाचा थरार । Khopoli News
– सामाजिक भान जपणारा कृतिशील लेखक हरपला, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे 74व्या वर्षी दुःखद निधन । Nagnath Kotapalle Died
– मोठी बातमी! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी गुडन्यूज, जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

व्हिडिओ – अग्निप्रलयापासून थोडक्यात वाचले र. वा. दिघे वाचनालय, वाचा थरार । Khopoli News

Next Post

स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल जयंतीनिमित्त दापोडीत कार्यक्रम, अशोक मगर यांच्याकडून ‘चलो दापोडी’चा नारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Veer-Bhai-Kotwal

स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल जयंतीनिमित्त दापोडीत कार्यक्रम, अशोक मगर यांच्याकडून 'चलो दापोडी'चा नारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह 77.54 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि 683.63 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

October 18, 2025
Ajit Pawar will inaugurate head office of Shri Dolasnath Cooperative Society Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन । Talegaon Dabhade

October 18, 2025
Adulterated stock worth Rs 2 crore seized during festive season major action by Food and Drug Administration

सणासुदीच्या काळात दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई । Pune News

October 18, 2025
Bogus voters in voter list Shiv Sena UBT Party statement to Tehsildar Vadgaon Maval

मतदार यादीत बोगस मतदार… शिवसेना उबाठा पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन । Vadgaon Maval

October 18, 2025
Talegaon Dabhade Municipal Council Election NCP Party invites applications from interested candidates

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज । Talegaon Dabhade

October 18, 2025
Womens honor ceremony in Induri Attractive Paithani gift from Vighnahar Patsanstha

इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा – विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

October 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.