Dainik Maval News : सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिर तळेगाव दाभाडे शाळेत २००४ च्या बॅचचे सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी ह्यांनी एकत्र रित्या नियोजन करून एक अप्रतिम देखणा सोहळा साजरा केला. त्यांना शिकवलेल्या बालवाडी ते १० वी पर्यंत च्या सर्व शिक्षक व संस्थेचे माननीय पदाधिकारी ह्या सर्वांनाच खूप सुखद धक्का दिला.
अवघे ८ दिवसात नियोजन करून सर्व जबाबदारी उत्तम रीतीने प्रत्येकाने पार पाडली .९ ते ३.३० अशी कार्यक्रमाची वेळ. सुंदर अशी कार्यक्रम पत्रिका तयार करून सर्व माजी शिक्षकांना फोन वर ,व्हाट्सअप वर आग्रहाचे येण्याचे आमंत्रण दिले. सर्वांनी शाळा सुंदर सजवली आकर्षक अशा रांगोळ्या काढल्या.
शाळेत प्रवेश करताच शिक्षक व शिक्षकेतर सर्व कर्मचारी ह्यांचे औक्षण करून अत्यंत छान नाश्ता देण्यात आला. पुष्पदलांची शिक्षकांवर उधळण करत त्यांना जिथे त्यांचा पूर्वीचा १० विचा वर्ग होता तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले. अत्यंत उच्च विद्याविभूषित , उत्तम पदावर सध्या कार्यरत असूनही अत्यंत आत्मियतेने व नम्रतेने कार्यक्रमाची रंगत वाढवत होते.
परदेशात असलेले काही जण ऑनलाईन कार्यमाचा आनंद घेत होते. त्यादिवशी जणू त्यांची शाळा भरली होती घंटेचा नाद करून त्यांच्या वर्गात त्यांनी दीपप्रज्वलन ,राष्ट्रगीत, प्रार्थना प्रतिज्ञा घेतली नंतर आपली स्वतःची ओळख व सध्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत हे सांगितले. मागच्या स्मृतींना उजाळा देत डिजिटल बोर्ड वर काही व्हिडिओ दाखवले.
सर्व उपस्थित असलेल्यांचा सत्कार केला त्यात शिक्षकेतर कर्मचारी ह्यांना सन्मानपत्र ,शिक्षकांना कृतज्ञतापत्र, शाल, श्रीफळ, स्वतः तयार केलेले भेटकार्ड ,पर्यावरण पूरक बुके प्रदान केले .सर्व उपस्थित संस्था पदाधिकारी यांचाही सत्कार केला .नंतर अप्रतिम सुग्रास भोजन व त्यानंतर सर्वांनाच फेटे बांधून एक आनंदाची आठवण म्हणून ग्रुप फोटो घेतला.
शाळेची घंटा वाजून कार्यक्रम सुरू झाला तो वंदेमातरम ने सांगता झाली.अत्यंत सुंदर अशा flex वर सगळ्यांनी अभिप्राय लिहिले व अत्यंत भारावलेल्या मनःस्थितीत विद्यार्थी परत भेटू म्हणून एक मेकांचा निरोप घेत होते.
ह्यामध्ये रणजीत काकडे,अमेय झेंड , कल्पेश कुलकर्णी, विक्रांत पवार, श्रद्धा बेंडाळे, अमृता बेळे, विशाखा बेके ,शलाका वझे,मृण्मयी महाजन , सोनम लागू या सर्वांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
सन 2004 चे 40 विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते शाळेला त्यांनी क्रीडा साहित्य भेट म्हणून दिले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, अंमलबजावणी अधिकारी अनंत भोपळे., शिक्षण समिती सदस्या डॉ ज्योती चोळकर ,संस्थेचे सदस्य विश्वास देशपांडे, प्राथमिक विभागाचे चे मुख्याध्यापक नवनाथ गाढवे, नितीन शिंदे, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी व आजी,माजी शिक्षक उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime