Dainik Maval News : गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुकन्या रितेश चोरघे यांची निवड झाली आहे. उपसरपंच पदी निवड झाल्यानंतर चोरघे समर्थकांनी डीजे, डॉल्बी आणि ढोलताशांच्या दणदणाटाला फाटा देत किर्तन सोहळ्याचे आयोजन केले होते.
मावळत्या उपसरपंच शकुंतला राजेश कदम यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. सरपंच निशा गणेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदासाठी सुकन्या रितेश चोरघे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सावंत यांनी चोरघे यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य किरण संभाजी सावंत, प्रियंका मिलिंद आगळे, शकुंतला राजेश कदम, छाया संतोष सावंत, किरण दिनेश येवले, गौरव बाळासाहेब चोरघे उपस्थित होते. ग्रामसेविका स्वाती गोसावी यांनी निवडणूक सहाय्य म्हणून काम पाहिले.
सुकन्या रितेश चोरघे यांची उपसरपंच पदी निवड होताच, त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. चोरघे यांच्या निवडी नंतर चोरघे कुटूंबिय व समर्थकांनी ढोल ताशा व डीजेच्या मिरवणुकीला फाटा देत ह.भ.प.संतोष महाराज पायगुडे यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले.
ह. भ. प. संतोष महाराज पायगुडे यांनी संत वचनाचे अनेक दाखले दिले. समाज सेवा ही संत सेवा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. चोरघे परिवाराने निवडणूकी नंतर किर्तन सेवा घेऊन स्तुत्य उपक्रम राबविला. टाळ, विणा, मृदुंगाचा गजर आणि विठ्ठल नामात गावकरी रंगून गेले होते.
नवनिर्वाचित उपसरपंच सुकन्या रितेश चोरघे म्हणाल्या, ” उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे आभार मानते. सार्वजनिक विकास आणि वैयक्तिक लाभाच्या योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळमधील पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद? लेकीच्या रिल्समध्ये दोन दहशतवादी कैद झाल्याचा वडिलांचा दावा
– पवनाधरणाच्या जागेवर अवैध बांधकामे ; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी । Pavana Dam
– लॅपटॉप, संगणक चोरणाऱ्या कामगारास तमिळनाडूमधून अटक, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी । Maval Crime