केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना ( Amrit Bharat Station Scheme ) राबवण्यास सुरुवात केली आहे. ह्या योजने अंतर्गत देशभरातील 1 हजार 309 रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणेसह लोणावळा, दौंड, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि इतर स्थानकांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात 1 हजार 309 स्थानकांचा विकास केला जाणार आहे. यात पुणे शहरासह अकोला, भुसावळ, चंद्रपूर, कोल्हापूर, दादर, गुलबर्गा, जळगाव, कल्याण, कुर्ला, मलकापूर, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर, नाशिक रोड, सोलापूर, ठाणे, वर्धा, लोणावळा, मनमाड, अमरावती, मिरज, अहमदनगर, माथेरान, चाळीसगाव, देवळाली, शेगाव, कराड, सांगली, दादर, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, धरणगाव या स्थानकांचा समावेश आहे. या योजनेत स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. त्यामुळे या स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. ( Amrit Bharat Station Scheme Lonavala Railway Station Will Be Transformed )
लोणावळा हे जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आवडीचे ठिकाण आहे. त्यामुळे इथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते. अशात पर्यटकांना लोणावळा शहरात आल्यानंतर येथील इतिहास आणि परिसराची ओळख व्हावी आणि प्रसन्न वाटावे ह्या हेतूने रेल्वे स्थानकाची रचना करण्यात येणार आहे.
अमृत भारत स्थानक योजनेत दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा शाश्वत विकास करणे अपेक्षित आहे. यामध्ये स्थानकांवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्यांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे, जसे की स्थानकावरील सुविधा सुधारणे, फिरणारे क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार लिफ्ट/एस्केलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क. प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन ‘एक स्टेशन एक उत्पादन’ योजनांद्वारेउत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसाय बैठकीसाठी नामांकित जागा, लँडस्केपिंग इत्यादी, या योजनेत इमारतीत सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाचे एकत्रीकरण, मल्टीमॉडल इंटिग्रेशन, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, ‘रूफ प्लाझा आवश्यकतेनुसार, टप्प्याटप्प्याने आणि व्यवहार्यता आणि स्टेशनवर दीर्घकालीन सिटी सेन्टर्स निर्माण करणे. ( Amrit Bharat Station Scheme Lonavala Railway Station Will Be Transformed )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘दगडूशेठ’ गणपती चरणी लीन; ‘भारत विश्वगुरु व्हावा’ नरेंद्र मोदी यांनी केला संकल्प
– लोणावळा शहरातील नारायणी धाम इथे सुरु असलेल्या श्रीमद भागवत कथा सप्ताहाला राज्यपाल रमेश बैस यांची भेट
– ‘समृद्धी’चे आणखीन बळी! गर्डर आणि क्रेन कोसळल्याने 17 कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त