Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बऊर येथे 11 फुटी महाकाय अजगर आढळून आला. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास रघुनाथ वाळुंजकर यांच्या घराच्या भिंती शेजारी हा अजगर आढळून आला. अजगराला वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी रेस्क्यू केले असल्याची माहिती संस्थेचे सदस्य सोमनाथ चौधरी यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बऊर (ता.मावळ) येथील प्रकाश वाळुंजकर यांचा कॉल आल्यानंतर वन्यजीव रक्षक सर्पमित्र सोमनाथ चौधरी, चंदू बोंबले, ओमकार मगर यांनी घटनास्थळी पाहणी करत वाळुंजकर यांच्या घराच्या भिंती शेजारी अजगर असल्याचे निदर्शनास आले. अजगराची लांबी जवळपास 11 फूट तर 14 किलो वजनाचा अजगर आढळला.
अजगराला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून वन्यजीव रक्षक संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे निलेश गराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रात सोडले आहे.
अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीत बुडणाऱ्या मुलीचा जीव वाचविणारा युवक ठरला देवदूत, कामशेत येथील घटना । Kamshet News
– मावळमधील तिनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवीन नियुक्त्या न झाल्याने नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहणार । Maval News
– भक्तिमय वातावरणात, साश्रूनयनांनी गणरायाला निरोप ; तळेगावात नऊ तास चालली विसर्जन मिरवणूक । Maval News